Join us

न्यूझीलंडची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 18:58 IST

गेल्या काही दिवसात येथील कोरोना रुग्णांची  संख्या शून्यावर आली आहे. सध्या देश लेव्हल २ मध्ये आहे. आंतरराष्ट्रीय सीमा बंद असल्याने नागरिकाना देशांतर्गत प्रवासासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्याचा फ़ायदा पर्यटन उद्योगाला होईल हा या मगचा हेतू आहे

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : न्यूझिलंडमध्ये दि, २८ फेब्रुवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. येेेथे परदेशी पर्यटकांनमुळे कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला.त्यामुळे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली, आणि परिणामी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. गेल्या काही दिवसात येथील कोरोना रुग्णांची  संख्या शून्यावर आली आहे. सध्या देश लेव्हल २ मध्ये आहे. आंतरराष्ट्रीय सीमा बंद असल्याने नागरिकाना देशांतर्गत प्रवासासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्याचा फ़ायदा पर्यटन उद्योगाला होईल हा या मगचा हेतू आहे. 

 

यावर मात करण्यासाठी न्यूझिलंड सरकारने इलिमिनेशन स्ट्रैटेजी अमलात आणली आणि दि,२५ मार्च रोजी देश लॉक डाऊन केला. येथील लॉकडाउन हे ४ टप्प्यात विभागले गेले होते. या दरम्यान जनतेने काय करावे आणि काय करु नये याच्या सूचना रोज प्रसारित केल्या जात होत्या. न्यूझिलंडचे पंतप्रधान जसिंदा आरडेर्न आणि डिरेक्टर जेनरल ओफ हेल्थ डॉ.ऐश्ली ब्लूमफील्ड हे दर रोज दुपारी १  वाजता येथील जनतेस अप्डेट देत होते. येथील चार आठवड्यांच्या कठोर लॉकडाऊन नंतर कोरोना बधितांची संख्या कमी होऊ लगली आणि येथील लॉक्डाउन उठऊन देश लेव्हल ३ मधे गेला. येथील हॉस्पिटैलिटी इंडस्ट्रीत काम करणाऱ्या निखिल संजीव काळे व मल्टीनैशनल फार्मासिटीकल कंपनीते काम करणाऱ्या रुजुता महेश करजगिकर यांनी खास न्यूझिलंडवरून लोकमतला ही माहिती दिली.निखिल हा मूळचा दादरचा असून रुजूता ही मूळची डोंबिवलीची आहे.लग्नानंतर हे दोघे पती-पत्नी २०१७ ला नोकरीनिमित्त ते ख्राईस्टचर्च येथे स्थाईक झाले आहेत.

 

 ५० लाख लोकसंख्या असलेल्या यादेशात एकूण कोविडचे १५०४ रुग्ण सापडले होते, त्यात मृतांचा आकडा २१ असून १४५६ लोक कोविड मुक्त झाले आहेत. हा देश उत्तर व दक्षिण अशा दोन बेटांनी बनला असून त्याचे एकुण क्षेत्रफळ २६७७१० चौरसमीटर आहे.  या कलावधित  येथील अनेक उद्योगधंद्यांना कोरोनाचा फटका बसला असून पर्यटन उद्योगाचे  फार मोठे नुक़सान झाले आहे. तरी ही येथील जास्तीत जास्त नागरिकांना नोकरीत ठेवण्यासाठी सरकारने वेज सब्सिडीचे आयोजन केले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

 

गेल्या काही दिवसात येथील कोरोना रुग्णांची  संख्या शून्यावर आली आहे. सध्या देश लेव्हल २ मध्ये आहे. आंतरराष्ट्रीय सीमा बंद असल्याने नागरिकाना देशांतर्गत प्रवासासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्याचा फ़ायदा पर्यटन उद्योगाला होईल हा या मगचा हेतू आहे असे रुजुता करजगिकर यांनी सांगितले. न्यूझिलंडचा कोरोना मुक्तीचा ऍक्शन प्लन बघता,कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा छान प्रकल्प येथे रबावला आहे. या प्रकल्पात हॉटेल्स,बार, मॉल व इतर सर्व कमर्शियल इमारतीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी साइन इन शीट ठेवल्या आहेत. तसेच कोविड १९ अँप देखिल लॉंच करण्यात आला आहे. प्रत्येक कमर्शियल जागी प्रॉपर हाइजीन व फ़िज़िकल डिस्टन्सिंगची काटेकोरपणे काळजी घेण्यात आली आहे असे निखिल काळे यांनी सांगितले.

 

 

 

 

 न्यूझिलंडमध्ये आरोग्य सेवा खूप छान आहे.कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी येथील दवाखान्यात फोन व व्हिडिओ द्वारे सल्लामसलत सुरू करण्यात आली. कोरोनाच्या छोट्या केसेसना सर्वसाधारण डॉक्टरांनी हाताळल्या, तर गंभीर केसेस वर रुग्णालयात योग्य ते उपचार केले गेले. दि,१९ मार्च रोजी न्यूझिलंडची सीमा अनिवासीसाठी बंद केली गेली, तर रहिवासी व नागरिकांसाठी सीमा खुली असून प्रत्येकास दोन आठवड्याचे क्वारंटाईन  लागू केले गेले. सध्या येथे कोरोना लेवल २ मध्ये असून इथल्या शाळा,कॉलेज व इतर उद्योगधंदे सुरू करण्यात आले आहेत.येथे बोली भाषा इंग्लिश व माओरी असली तरी  इंटरनेटद्वारे लोकमत पेपर आणि मराठी वाचायला मिळते असे रुजूता करजगिकर यांनी दिली.

 

येथील हवामान सर्वसाधारणपणे थंड असून येथे पावसाळा हा प्रमुख ऋतू नसून पाऊस कधीही पडतो. वेलिंग्टन ही न्यूझिलंडची राजधानी असून ऑकलंड हे खूप गजबजलेले शहर आहे. जीडीपीत पर्यटनाचा वाटा ५. ८ % असून फायनान्स, इन्शुरन्स आणि रियल इस्टेट यांचे योगदान मोलाचे आहे. न्यूझिलंडच्या पंतप्रधानाच्या कुशल नेतृत्वामुळे कोरोनाच्या या महामारीतून हा देश सूखरूप बहेर पडत आहे अशी माहिती रुजुता करजगिकर यांनी शेवटी दिली.

 

 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यान्यूझीलंड