सुजित महामुलकर -
मुंबई : भाजपने उमेदवारीबाबत प्रचंड गुप्तता पाळली होती. त्यानंतरही पक्षात लक्षणीय बंडखोरी झाली. ही बाब मारक ठरण्याची शक्यता असल्याने पक्षाच्या अनेक नेत्यांनी बुधवारी ‘थर्टी फर्स्ट’चा साजरा करण्याऐवजी बंडखोरांची समजूत काढण्यात दिवस खर्ची केला.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कुणाला उमेदवारी देण्यात आली याबाबत भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी प्रचंड गुप्तता पाळली होती. त्यानंतरही बंडखोरी झाली. अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी पक्षातील आपल्या पदाचे राजीनामे दिले, तर इतरांनी थेट अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून आपला संताप व्यक्त केला.
आमदारही मदतीला धावलेमुंबई भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी काही नाराज, तर काही ‘सौम्य’ बंडखोर उमेदवारांना चर्चा करण्यासाठी कार्यालयात बोलावले. या कामात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, तसेच अन्य काही नेत्यांचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये काही आमदारही पुढाकार घेत असून, उमेदवारी मागे घेण्याची शेवटची मुदत २ जानेवारी असल्याने आज ३१ डिसेंबर आणि नव्या वर्षाचा पहिला दिवस बड्या नेत्यांना बंडखोरांमागे खर्ची घालवावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.
अशा नाराज आणि बंडखोर उमेदवारांच्या भेटीगाठी भाजप नेत्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळ बैठक आटोपल्यानंतर बुधवारी सांस्कृतिक कार्य मंत्री, मुंबई भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी दादरचे पक्ष कार्यालय गाठले.
Web Summary : Facing significant rebellion after candidate announcements, BJP leaders spent New Year's Eve pacifying disgruntled members. Ashish Shelar and other leaders are actively engaging with rebels, hoping to convince them to withdraw before the deadline, with MLAs also assisting.
Web Summary : उम्मीदवारों की घोषणा के बाद महत्वपूर्ण विद्रोह का सामना करते हुए, भाजपा नेताओं ने असंतुष्ट सदस्यों को शांत करने में नए साल की पूर्व संध्या बिताई। आशीष शेलार और अन्य नेता सक्रिय रूप से विद्रोहियों के साथ जुड़ रहे हैं, उम्मीद है कि वे समय सीमा से पहले उन्हें वापस लेने के लिए मना लेंगे, विधायकों की भी सहायता मिल रही है।