Join us  

मनसेच्या दणक्यानंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा’ने जारी केला नवीन व्हिडीओ, सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 9:37 AM

मनसेने आक्षेप नोंदवल्यानंतर तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांनीही ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले होते.

ठळक मुद्देचंपक चाचाच्या भूमिकेत असलेल्या अमित भट यांनी राज ठाकरेंची लेखी माफी मागितली होती.महाराष्ट्राचं शहर मुंबई येथील स्थानिक आणि प्रचलित भाषा मराठी आहे.कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अंत:करणापासून माफी मागतो

मुंबई - मुंबईची आमभाषा ही हिंदी आहे या वक्तव्यावरुन अडचणीत आलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेने नवीन व्हिडीओ जारी केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चंपक चाचा या व्यक्तिरेखेने मुंबईची भाषा हिंदी असून सुविचार हिंदीत लिहिला पाहिजे असं विधान केले होते. त्यावरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. 

या व्हिडीओत आपले गोकुलधाम कुठे आहे, मुंबईत आणि मुंबईची भाषा काय आहे? हिंदी,’ असा एक संवाद बापूजी चंपक लाल या एपिसोडमध्ये म्हणताना दिसले. त्यावर मनसेचे अमेय खोपकर यांनी नेमक्या याच संवादावर आक्षेप घेत, ‘हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता,’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती तसेच यांची मस्ती उतरवावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

त्यानंतर या मालिकेत काम करणारे मेहता लाल या कलाकाराने व्हिडीओ जारी केला आहे. त्यात म्हटलंय की, भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्राचं शहर मुंबई येथील स्थानिक आणि प्रचलित भाषा मराठी आहे. मुंबईने नेहमी सर्वांना सामावून घेतले, सर्व भाषांचा सन्मान केला. मात्र चंपक चाचांनी केलेल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्यांची अंत:करणापासून माफी मागतो असं सांगितले आहे. 

मनसेने आक्षेप नोंदवल्यानंतर तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांनीही ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले होते. या मालिकेत चंपक चाचाच्या भूमिकेत असलेल्या अमित भट यांनी राज ठाकरेंची लेखी माफी मागितली होती. त्यांनी माफीनाम्यात लिहिले आहे की, मी अमित भट तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करतो. सदर मालिकेत मी चंपक चाचा ही भूमिका साकारतो. या मालिकेत काम करत असताना लेखकाने दिलेले संवाद बोलताना मुंबई येथील भाषा हिंदी आहे असे माझ्याकडून चुकून बोलले गेले आहे. कारण स्क्रिप्टमध्ये तसे शब्दे होते. तरीदेखील मुंबई येथील भाषा हिंदी नसून मराठी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. सदर झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी पण मागतो. यापुढे अशी चूक होणार नाही याची मी व्यक्तीशः दखल घेईन. वरील बाब समजून घेऊन आपण मला माफ कराल अशी विनंती केली होती. 

तारक मेहता का उल्टा चष्मामधील या अभिनेत्याने मागितली माफी, हिंदी भाषेला म्हटले होते मुंबईची भाषा

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मामनसेमराठी