Join us

पालिकेतील सभागृहनेते, समिती अध्यक्षांना नवीन गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 04:07 IST

महापालिकेतील उपमहापौर, सभागृह नेत्या, विरोधी पक्षनेते व विविध समित्यांच्या अध्यक्षांची यंदाची दिवाळी सुसाट होणार आहे.

मुंबई : महापालिकेतील उपमहापौर, सभागृह नेत्या, विरोधी पक्षनेते व विविध समित्यांच्या अध्यक्षांची यंदाची दिवाळी सुसाट होणार आहे. पालिकेकडून देण्यात येणारी वाहने जुनी झाल्यामुळे नवीन गाड्या दिल्या जाणार आहेत. या गाड्या दिवाळीपर्यंत उपलब्ध होणार आहेत.उपमहापौर, सभागृह नेत्या, विरोधी पक्षनेते आणि विविध समित्यांचे अध्यक्ष यांना ते सध्या वापरत असलेली वाहने वारंवार बिघडत असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही नेत्यांची वाहने तर तीन-चारवेळा रस्त्यातच बिघडल्यामुळे त्यांना दुसऱ्या वाहनाने जावे लागले होते. पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी याबाबत तक्रार करीत नवीन वाहने खरेदी करण्याची मागणी केली होती. महत्त्वाच्या कामासाठी जात असतानाच पालिकेची वाहने वाटेत बिघडतात. ते वाहन दुरुस्त होईपर्यंत रस्त्यात थांबून राहावे लागते.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका