Join us

‘वंदे भारत’ने बुलेट ट्रेनचा रेकाॅर्ड ताेडला; ५ तासांत अहमदाबादहून मुंबई गाठली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 06:31 IST

वंदे भारत रेल्वेच्या देशातील विविध भागात चाचण्या सुरू आहेत. अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर शुक्रवारी चाचणी घेण्यात आली.

अहमदाबाद : बुलेट ट्रेन ही जगातील सर्वात वेगवान रेल्वे म्हणून ओळखली जाते. मात्र, भारताची सर्वात वेगवान रेल्वे ‘वंदे भारत’ने बुलेट ट्रेनचा रेकाॅर्ड माेडला आहे. पिकअपच्या बाबतीत वंदे भारतने बुलेट ट्रेनला पछाडले आहे. ० ते १०० किमी ताशी वेग पकडण्यासाठी वंदे भारतने केवळ ५२ सेकंद घेतले. तर बुलेट ट्रेनला ५४ सेकंद लागतात. 

वंदे भारत रेल्वेच्या देशातील विविध भागात चाचण्या सुरू आहेत. अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी वंदे भारतने केवळ ५२ सेकंदांमध्ये ताशी १०० किमी एवढा वेग घेतला. बुलेट ट्रेनला यासाठी ५४.६ सेकंद लागतात. त्यामुळे या गाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला आहे. 

पाच तासांमध्ये गाठले मुंबई सेंट्रलअहमदाबाद ते मुंबईपर्यंतचे अंतर वंदे भारतने केवळ ५ तासांमध्येच कापले. सकाळी सव्वासात वाजता निघालेली रेल्वे दुपारी १२.१६ वाजता मुंबई सेंट्रल येथे पाेहाेचली.

अहमदबाद-मुंबई वंदे भारत... अहमदाबाद-मुंबई वंदे भारत रेल्वे लवकरच सुरू हाेणार आहे. ही गाडी ३० सप्टेंबरपासून सुरू हाेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने ही भेट प्रवाशांना मिळू शकते.

नव्या गाड्यांचा ताशी १८० किमी वेगवेगवेगळ्या रेल्वे विभागांमध्ये वंदे भारतच्या चाचण्या झाल्या. त्यावेळी ही गाडी ताशी १८० किमी एवढ्या वेगाने धावली. जुन्या वंदे भारतचा वेग ताशी १६० किमी एवढा आहे. 

टॅग्स :वंदे भारत एक्सप्रेसबुलेट ट्रेन