उत्पन्नवाढीसाठी नवे ‘शॉर्ट रूट्स’

By Admin | Updated: February 10, 2015 00:26 IST2015-02-10T00:26:45+5:302015-02-10T00:26:45+5:30

तोट्यात चाललेल्या एनएमएमटीच्या उत्पन्नवाढीसाठी परिवहन उपक्रमाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग

New 'Short Roots' | उत्पन्नवाढीसाठी नवे ‘शॉर्ट रूट्स’

उत्पन्नवाढीसाठी नवे ‘शॉर्ट रूट्स’

नवी मुंबई : तोट्यात चाललेल्या एनएमएमटीच्या उत्पन्नवाढीसाठी परिवहन उपक्रमाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तोट्यात चाललेले सहा मार्ग आतापर्यंत बंद करण्यात आले आहेत. येत्या काळात प्रवाशांना सोयीचे ठरणारे आणि उत्पन्नवाढीला चालना देणारे कमी अंतराचे अर्थात शॉर्ट रूट्स सुरू करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे.
महापालिकेची एनएमएमटी सेवा विविध कारणांमुळे तोट्यात आहे. या पार्श्वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी उपक्रमाने आता कंबर कसली आहे. मागील वर्षभरापासून एनएमएमटीचे व्यवस्थापकपद रिक्त आहे. शिरीष आरदवाड हे सध्या प्रभारी व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. आरदवाड यांनी मागील वर्षभरात एनएमएमटीची सेवा लोकाभिमुख बनविण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी काही कठोर निर्णय घेतले आहेत. सीबीडी-मुंबई विमानतळ, वाशी ते अंधेरी, दिघा ते नाहूर स्टेशन, दिघा ते नेरूळ आणि तुर्भे ते वाशी हे तोट्यात चालणारे मार्ग बंद केले आहेत. उपक्रमाच्या दैनंदिनी तोट्यात घट झाली आहे. लवकरच कार्यक्षेत्राबाहेरील मार्गांवरील लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या पहाटे आणि सायंकाळच्या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना उपयुक्त ठरतील यादृष्टीने असे मार्ग सुरू करण्याची योजना असून त्यादृष्टीने चाचपणी सुरू असल्याची माहिती आरदवाड यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)

Web Title: New 'Short Roots'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.