प्रश्न : मी असे ऐकले आहे की, १ जानेवारी २०२५ पासून नॉनइमिग्रंट व्हिसाच्या मुलाखतीच्या वेळेचे पुनर्नियोजन करण्याच्या नियमात काही बदल आहेत. काय बदल झाले आहेत आणि का?उत्तर : नॉनइमिग्रंट व्हिसा मुलाखतीसाठी प्रत्येकाला समान संधी मिळावी आणि प्रतीक्षा वेळ कमी व्हावा, यासाठी आम्ही नियमांत काही बदल केले आहेत. हे बदल १ जानेवारी २०२५ पासून लागू झाले आहेत. १ जानेवारी २०२५ पासून, अर्ज करणाऱ्यांना त्यांच्या मुलाखतीच्या वेळेत बदल करायचा असेल तर केवळ एकदाच संधी मिळेल. याव्यतिरिक्त, व्हिसा अप्लिकेशन सेंटर किंवा यू.एस. दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात अर्जदाराची मुलाखतीसीठी दिलेली वेळ जर हुकली तर त्यांना व्हिसा अर्जाचे पैसे नव्याने भरून पुन्हा नव्याने मुलाखतीची वेळ घ्यावी लागेल. व्हिसा मुलाखतीचा प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी आणि मुलाखतीच्या वेळेचा प्रभावीपणे उपयोग करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. मुलाखतीची वेळ हुकणे, किंवा पुनर्निर्धारित केलेल्या मुलाखती आणि उपस्थित नसल्याचा फटका इतर अर्जदारांच्या मुलाखती घेण्यावर होतो. त्यामुळे मुलाखतीची प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतालये भारतात सर्व व्हिसा अर्जदारांना नियोजनबद्ध, उच्चप्रतीची सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या बदलांचा उद्देश उपलब्ध मुलाखतीच्या वेळेत सुधार करणे हा आहे. यामुळे ज्यांना अमेरिकेला भेट द्यायची आहे त्यांच्या मुलाखतीची प्रतीक्षा वेळ कमी होईल. या धोरण बदलासंदर्भात अधिक आमच्या www.ustraveldocs.com. या संकेतस्थळावर मिळेल.
अमेरिकेच्या व्हिसा मुलाखतीच्या वेळेसाठी नवे नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:42 IST