नया दौर : दिलीप कुमार यांची वयाच्या 94व्या वर्षी फेसबूकवर एंट्री
By Admin | Updated: April 12, 2017 21:56 IST2017-04-12T21:31:29+5:302017-04-12T21:56:35+5:30
बॉलिवूडमधील महानायकांपैकी एक असलेले दिलीप कुमार आता फेसबूकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना भेटणार आहेत

नया दौर : दिलीप कुमार यांची वयाच्या 94व्या वर्षी फेसबूकवर एंट्री
>ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 12 - बॉलिवूडमधील महानायकांपैकी एक असलेले दिलीप कुमार आता फेसबूकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना भेटणार आहेत. ट्विटरवर याआधीपासूनच सक्रिय असलेल्या दिलीप कुमार यांनी वयाच्या 94 व्या वर्षी Official: Dilip Kumar या फेसबूक पेजवरून फेसबूकच्या जगात आपली एंट्री घेतली आहे.
हे फेसबूक पेज आजच सुरू करण्यात आले असून, त्यावर दिलीप कुमार यांनी एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानो दिसत आहेत. बॉलिवूडचे "ट्रॅजेडी किंग" म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी त्यांची फेसबूकवरील एंट्री ही एक खुशखबर ठरणार आहे.
दिलीप कुमार यांनी मुुघल ए आझम, नया दौर, कर्मा अशा विविध सुपरहिट चित्रपटांमधून अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्कारासह विविध पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले आहे.