नव्या रेल्वे प्रकल्पांचा बोजा प्रवाशांवर?

By Admin | Updated: October 28, 2014 02:04 IST2014-10-28T02:04:41+5:302014-10-28T02:04:41+5:30

मध्य रेल्वेमार्गावर येत्या काही वर्षात 397 कोटी रुपयांच्या कामांबरोबरच 600 कोटी रुपयांचा स्वयंचलित दरवाजाचा खर्च असून, हा खर्चाचा डोंगर आणखी वाढतच जाणार आहे.

New railway projects burden passengers? | नव्या रेल्वे प्रकल्पांचा बोजा प्रवाशांवर?

नव्या रेल्वे प्रकल्पांचा बोजा प्रवाशांवर?

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर येत्या काही वर्षात 397 कोटी रुपयांच्या कामांबरोबरच 600 कोटी रुपयांचा स्वयंचलित दरवाजाचा खर्च असून, हा खर्चाचा डोंगर आणखी वाढतच जाणार आहे. प्रकल्पांसाठी लागणारा खर्च आणि होणारा तोटा पाहता भाडेवाढ आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. 
मध्य रेल्वेमार्गावर 397 कोटी 14 लाख रुपयांची कामे केली जाणार असून, वेगवेगळ्या कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. यात महत्त्वाच्या पनवेल-पेण-थळ इलेक्ट्रीफिकेशनसाठी 109 कोटी 68 लाख रुपये, नवीन थांबे आणि रेल्वे डब्यांच्या कामांसाठी 58 कोटी रुपये, मुंबई विभागात असणारे लाइन क्रॉस गेट बंद करून त्याऐवजी रोड ओव्हर ब्रीज बांधण्यात येणार असून, त्यासाठी त्या कामासाठी 52 कोटी 87 लाख रुपयांचा खर्च, सिग्नल आणि  दूरसंचार, पुलांचे नूतनीकरण आणि रेल्वेच्या अखत्यारीत येणा:या रस्ते सुरक्षा कामांसाठीही 130 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. स्वयंचलित दरवाजांसाठी तब्बल 600 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च पाहता तो जवळपास हजार कोटीर्पयत जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मध्य रेल्वेला 2012-13 आणि 13-14मध्ये प्रत्येकी 727.47 कोटींचा तोटा झाला आहे. प्रकल्पांसाठी लागणारा निधी आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने  भाडेवाढ अपरिहार्य आहे.
 
च्येत्या काही काळात अनेक मोठी कामे मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात येणार आहेत. मात्र दुसरीकडे रेल्वेला तोटाही झालेला आहे. हे पाहता आमच्याकडून निधी मिळवण्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. निधीसाठी एकतर राज्य सरकारकडून मदत मिळावी किंवा दुसरी बाब म्हणजे भाडेवाढीशिवाय पर्याय नाही, असे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
 
च्मध्यंतरी रेल्वेकडून भाडेवाढ करण्यात आली होती. ही भाडेवाढ दुप्पट असल्याने त्याविरोधात असंतोष व्यक्त करण्यात आला आणि पासात करण्यात आलेली दुप्पट वाढ मागे घेण्यात आली. ही वाढ मागे घेतली 
नसती तर रेल्वेला मोठी आर्थिक मदत मिळाली असती, असे रेल्वेच्या अधिका:यांकडून मत व्यक्त केले जात आहे. 
 
च्पश्चिम रेल्वेलाही मागील दोन वर्षात प्रत्येकी जवळपास 500 ते 550 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना लोकलचे दरवाजे स्वयंचलित करण्यासाठी जवळपास 450 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च पाहता निधी आणणार कुठून, असा प्रश्न त्यांनाही पडला आहे. 

 

Web Title: New railway projects burden passengers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.