Join us  

अनाथ मुलांच्या नोंदणीसाठी 'सरल पोर्टल' वर नवा पर्याय उपलब्ध; शासनाने काढलं परिपत्रक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 7:39 PM

सरल पोर्टलमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी आईवडील यांचे नाव माहित नसल्याने मधले नाव Not known सुविधा उपलब्ध करावी

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या सरल पोर्टलवर सर्व विद्यार्थ्यांची माहिती नोंदविण्यात येते मात्र या पोर्टलवर अनाथ मुलांची माहिती नोंदविताना अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने परिपत्रक काढलं आहे. त्यामुळे अनाथ मुलांना त्यांची माहिती पोर्टलवर भरताना सुलभ जाणार आहे. 

अनाथ मुलांच्या प्रवेशाकरिता अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावी असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. आरटीईमध्ये 25 टक्के प्रवेशाकरिता बालगृह, अनाथलये मधील विद्यार्थी संवर्गाचा समावेश करावा तसेच अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे म्हणून उत्पन्नाचा दाखला विचारात घेण्यात येवू नये अशी सूचना केली आहे. 

तसेच सरल पोर्टलमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी आईवडील यांचे नाव माहित नसल्याने मधले नाव Not known सुविधा उपलब्ध करावी. त्याचसोबत शेवटचे नाव, धर्म माहित नसल्याने त्याठिकाणीही Not Known सुविधा द्यावी आणि ज्या अनाथ मुलांना दत्तक घेतलं गेलं आहे त्यांच्यासाठी New Entry Tab उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे अनाथ मुलांना सरल पोर्टलवर नोंदणी करताना येणारी अडचण दूर होण्यास मदत मिळाली आहे. 

याबाबत राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, अनाथ विद्यार्थ्यांच्या पालकांचे नाव आडनाव .धर्म जात इ.माहिती उपलब्ध नसल्याने अनाथ मुलांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या प्रमाणे शालेय शिक्षण विभागाच्या सरल पोर्टलमध्ये सुधारण्या करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आयोगाने उपस्थित केलेल्या गंभीर समस्येची दखल घेतमंत्री आशिष शेलार यांनी प्राथमिक शालेय शिक्षण तांत्रिक संचालकांना या अडचणी दूर करण्याबाबत सूचना केली होती.  

टॅग्स :आशीष शेलार