दहिसर नदीच्या संरक्षक भिंतीला आला 'न्यू लूक'!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 02:47 PM2021-06-14T14:47:59+5:302021-06-14T14:52:48+5:30

Dahisar river : दहिसर नदीवरील दुतर्फा भिंतीवरील सामाजिक संदेश व वन्यजीवांच्या भित्तिचित्रांनी केलेले सुशोभिकरण, दहिसर नदीच्या संरक्षक भिंतीवर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच रंगीबेरंगी छत्र्यांच्या सुशोभित सेल्फी पॉइंट यामुळे दहिसरच्या वैभवात भर पडली आहे.

'New look' came to the protective wall of Dahisar river! | दहिसर नदीच्या संरक्षक भिंतीला आला 'न्यू लूक'!

दहिसर नदीच्या संरक्षक भिंतीला आला 'न्यू लूक'!

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : पश्चिम उपनगरातील शेवटचे टोक दहिसर असून येथील दहिसरची नदी हे दहिसरकरांचे वैभव आहे. दहिसर नदीच्या संरक्षक भिंतीला आणि परिसराला आता न्यू लूक आला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निधीतून दहिसर नदीचा बदलला चेहरा मोहरा बदलला आहे.

दहिसर नदीवरील दुतर्फा भिंतीवरील सामाजिक संदेश व वन्यजीवांच्या भित्तिचित्रांनी केलेले सुशोभिकरण, दहिसर नदीच्या संरक्षक भिंतीवर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच रंगीबेरंगी छत्र्यांच्या सुशोभित सेल्फी पॉइंट यामुळे दहिसरच्या वैभवात भर पडली आहे. तरुणांमध्ये आपल्या मोबाईल मधून सेल्फी काढण्यासाठी उत्सुकता असून तरुणांची येथे गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच त्यांच्या निधीतून आणि संकल्पनेतून ही आकर्षक कलाकृती साकारली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि प्रभाग क्रमांक 7 च्या स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

दहिसरकर हे शनिवार व रविवारी शिवाजी पार्क, जुहू चौपाटी मरिन-लाइन्सच्या क्विन्स नेकलेसला जाऊ शकत नाही. मात्र याठिकाणी असलेले रंगीबेरंगी दिवे आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या सुशोभित सेल्फी पॉइंटमुळे या परिसराला जणू क्विन्स नेकलेसचे स्वरूप आले असल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी 'लोकमत'ला दिली. तसेच, पर्यावरणाचे रक्षण करा, जलप्रदूषण रोखा असे सामाजिक संदेश देखिल येथील संरक्षक भिंतीवर सुशोभिकरणातून सादर केले आहे. दहिसर गाव म्हणून दहिसरची पुरातन ओळख आहे. मात्र या सुशोभिकरणाच्या माध्यमातून दहिसरचे गावपण जपण्याचा प्रयत्न केला आहे, असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कामाचा उद्घाटन सोहळा शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांच्या हस्ते काल सायंकाळी पार पडला. आपल्या भाषणात त्यांनी शीतल म्हात्रे यांच्या कल्पकतेचे कौतुक करून सतत नाविन्याचा ध्यास घेत त्या एक प्रोग्रेसिव्ह नगरसेविका या प्रभागाला लाभल्या असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस व शीतल म्हात्रे यांच्या सूचना आमलात आणण्यासाठी दहिसर मध्ये आगरी कोळी भवन बांधण्या संदर्भात उपनगर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत लवकर बैठक आयोजित केली जाईल अशी माहिती सूरज चव्हाण यांनी दिली.

या प्रसंगी विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस आणि महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, नगरसेविका शीतल म्हात्रे, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे,उपविभागप्रमुख विनायक सामंत, अविनाश लाड तसेच इतर शिवसेना-युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी युवा सेनेच्या वतीने "रायजिंग स्टार" या गरजू खेळाडूंच्या संस्थेला आवश्यक वस्तूंचे किट भेट देण्यात आले.

Web Title: 'New look' came to the protective wall of Dahisar river!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई