हार्बरवर 2015 नंतर नवीन लोकल
By Admin | Updated: August 19, 2014 02:27 IST2014-08-19T02:27:51+5:302014-08-19T02:27:51+5:30
हार्बरवासीयांची नवीन लोकलची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. जुलै 2015 र्पयत हार्बरवर डीसी-एसी परावर्तनाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

हार्बरवर 2015 नंतर नवीन लोकल
मुंबई : हार्बरवासीयांची नवीन लोकलची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. जुलै 2015 र्पयत हार्बरवर डीसी-एसी परावर्तनाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. परावर्तनाचे काम पूर्ण झाल्यानंतर हार्बर मार्गावर नवीन लोकल धावू शकतील. त्यापूर्वी मध्य रेल्वेवरील ठाणो ते सीएसटी मार्गावरील डीसी-एसी परावर्तनाचेही काम डिसेंबरअखेरीस पूर्ण केले जाणार आहे.
सीएसटीवरील 18 प्लॅटफॉर्मला जोडणा:या 270 मीटर लांबीच्या पुलाचे सोमवारी उद्घाटन झाले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
पश्चिम रेल्वेमार्गावर 1,5क्क् करंट डीसी ते 25,क्क्क् करंट एसीचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वेमार्गावर हे काम पूर्ण झालेले नाही. मध्य रेल्वेमार्गावरील कल्याणपुढे एसीचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र कल्याण ते ठाणो संपूर्ण मार्गावर आणि ठाणो ते कल्याण पाचव्या-सहाव्या मार्गावर हे काम बाकी होते. 11 जानेवारी 2क्14 रोजी मध्य रेल्वेवरील या भागात डीसी ते एसीचे काम पूर्ण करण्यात आले. अखेर शेवटच्या टप्प्यातील ठाणो ते सीएसटीर्पयत सर्व लोकल मार्गावर काम बाकी असून, ते कामही त्वरित हाती घेण्यात आले. सप्टेंबर महिन्यार्पयत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वेकडून ठेवण्यात आले होते. आता ठाणो ते सीएसटी मार्गावरील डीसी-एसी परावर्तनाचे काम डिसेंबर अखेर्पयत पूर्ण करण्यात येणार असून जानेवारी महिन्यापासून नवीन लोकल येण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले. हे काम पूर्ण झाल्यानंतर हार्बर मार्गावर डीसी-एसी परावर्तनाचे काम हाती घेतले जाईल. हे काम जुलै 2015 र्पयत पूर्ण केले जाणार आहे. हार्बरचे काम करताना सोबतच ट्रान्स हार्बरवरही परावर्तनाचे काम पूर्ण केले जाईल. यानंतर हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर नवीन लोकल धावू शकतील, असे निगम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मध्य रेल्वेमार्गावर 121 लोकल असून त्यांच्या 1,618 फे:या होतात. 121 पैकी 36 लोकल हार्बर आणि 10 ट्रान्स हार्बरवर धावत असून यात संपूर्ण डीसी तसेच डीसी ते एसी अशा रेट्रोफिटेड लोकलचा समावेश आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर नवीन आणि मध्य रेल्वेवर ठाणो आणि डाऊन दिशेला नवीन लोकल धावत असून, ठाणो ते सीएसटीदरम्यान रेट्रोफिटेड तसेच भेल कंपनीच्या लोकल आहेत.
18 प्लॅटफॉर्मला जोडणारा पादचारी पूल खुला
सीएसटीवरील सर्वात लांबीच्या पादचारी पुलाचे 18 ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले. 270 मीटर लांबीचा असलेला हा पूल सीएसटीवरील तब्बल 18 प्लॅटफॉर्मला जोडलेला आहे. या पुलासाठी साडेआठ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. उद्घाटनावेळी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम आणि खासदार अरविंद सावंत, आमदार अॅनी शेखर आणि रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.