माजी मंत्री ढोबळे यांच्याविरुद्धच्या बलात्कार प्रकरणाची नव्याने चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:37 IST2018-05-19T05:37:58+5:302018-05-19T05:37:58+5:30
बोरीवली येथील नालंदा कॉलेजचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरुद्ध त्यांच्याच कॉलेजच्या महिला कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या बलात्काराच्या गुह्याची नव्याने चौकशी करा, असा आदेश बोरीवली येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नुकताच दिला.

माजी मंत्री ढोबळे यांच्याविरुद्धच्या बलात्कार प्रकरणाची नव्याने चौकशी
मुंबई : बोरीवली येथील नालंदा कॉलेजचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरुद्ध त्यांच्याच कॉलेजच्या महिला कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या बलात्काराच्या गुह्याची नव्याने चौकशी करा, असा आदेश बोरीवली येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नुकताच दिला.
ढोबळे यांच्याविरुद्ध पीडितेने बलात्कारासारखा गंभीर आरोप केलेला असतानाही, बोरीवली पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास केला नाही, असा ठपका ठेवून महानगर दंडाधिकारी ए. बी. शेंडगे यांनी बलात्काराचे हे प्रकरण फेरचौकशीसाठी पुन्हा संबंधित अधिकाºयांकडे पाठवून दिले, तसेच या प्रकरणाची फाइल बंद करण्याची (बी. समरी) बोरीवली पोलिसांची मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली. फिर्यादी पक्षातर्फे अॅड. अमरदीप भट्टाचार्य यांनी काम पाहिले.
ढोबळे यांनी २०११ आणि २०१३ या दरम्यान आपल्यावर तीन वेळा बलात्कार केल्याचा आरोप, नालंदा कॉलेजमध्ये २००० सालापासून सीनियर क्लार्क म्हणून काम करणाºया ४२ वर्षीय महिलेने केला आहे.
या प्रकरणाचा तपास करणाºया बोरीवली पोलिसांनी या महिलेचे आरोप तद्दन खोटे असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे हा खटला बंद करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती बोरीवली पोलिसांनी न्यायालयाला केली, परंतु या प्रकरणी बोरीवली पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत, महानगर दंडाधिकारी शेंडगे यांनी फेरचौकशीचा आदेश दिला.