Join us

नव्या धाटणीची एसी लोकल मध्य रेल्वे मार्गावर धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 01:17 IST

एसी लोकलची उंची जास्त आहे. परिणामी एसी लोकल चालविणे कठीण आहे.

मुंबई : अनेक कालावधीपासून मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी एसी लोकलच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र एसी लोकलचा मार्ग रेल्वे रूळ मार्गावरील पुलांनी अडविला आहे. एसी लोकलची उंची जास्त आहे. परिणामी एसी लोकल चालविणे कठीण आहे. यासाठी आत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) नव्या धाटणीची एसी लोकल तयार करत आहे. लवकरच ती मध्य रेल्वे मार्गावर धावताना दिसेल.सामान्य लोकल आणि एसी लोकल यांचया उंचीत फरक आहे. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल धावावी यासाठी आता पश्चिम रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एसी लोकलपेक्षा मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलची उंची १३ मिमीने कमी करण्यात आली आहे.भेलद्वारे या एसी लोकलची बांधणी करण्यात येत आहे. या लोकलमध्ये आरामदायी आसन, आधुनिक हॅडल, उभे राहण्यासाठी जास्त जागा, बॅगा ठेवण्यासाठी नव्या बांधणीचा रॅक, टॉक बॅक सिस्टिम आहे. ही एसी लोकल लवकरच मध्य रेल्वे मार्गावर धावेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :मुंबई लोकल