नेपाळला भूकंपग्रस्तांसाठी औषधे रवाना
By Admin | Updated: May 6, 2015 02:08 IST2015-05-06T02:08:02+5:302015-05-06T02:08:02+5:30
नेपाळ येथे २५ एप्रिलला झालेल्या भूकंपानंतर जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अन्न व औषध प्रशासनाने मंगळवार, ५ एप्रिलला जखमींवर उपचार करण्यासाठी औषधांचा साठा नेपाळला रवाना केला आहे.

नेपाळला भूकंपग्रस्तांसाठी औषधे रवाना
मुंबई : नेपाळ येथे २५ एप्रिलला झालेल्या भूकंपानंतर जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अन्न व औषध प्रशासनाने मंगळवार, ५ एप्रिलला जखमींवर उपचार करण्यासाठी औषधांचा साठा नेपाळला रवाना केला आहे. १५ टन वजनाचे १ हजार ६७ औषधांचे खोके नेपाळला पाठवण्यात आले.
दुपारी साडेतीनच्या सुमारास एफडीएच्या मुंबईच्या मुख्य कार्यालयातून हे ट्रक नेपाळला पाठवण्यात आले. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विद्या ठाकूर, एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे उपस्थित होते. राज्यातील ३० औषध कंपन्यांनी विविध औषधे भूकंपग्रस्तांना दिली आहेत.
बॅण्डेज, सर्जिकल हॅण्डग्लोव्हज, वेदनाशामक औषधे, प्रतिजैविके, अॅण्टीडायरियाची औषधे, टिटॅनस टाक्साइडचे इंजेक्शन, निर्जंतुकीकरणाची औषधे, इतर आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाणारी औषधे नेपाळला पाठवण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)