कर्जतमध्ये सर्वपक्षीयांकडून निषेध सभा
By Admin | Updated: November 8, 2014 22:25 IST2014-11-08T22:25:21+5:302014-11-08T22:25:21+5:30
तिहेरी हत्याकांडचा निषेध करण्यासाठी कर्जत मध्ये जागृत कष्टकरी संघटना,भारिप बहुजन महासंघ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने वतीने जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते

कर्जतमध्ये सर्वपक्षीयांकडून निषेध सभा
कर्जत : जावखेडे खालसा तिहेरी हत्याकांडचा निषेध करण्यासाठी कर्जत मध्ये जागृत कष्टकरी संघटना,भारिप बहुजन महासंघ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने वतीने जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते
येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकामध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी जागृत कष्टकरी संघटनेच्या प्रमुख नॅन्सी गायकवाड, भारिप महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिपक मोरे, भाकपचे जिल्हा सरचिटणसि गोपाळ शेळके, भारतीय बौद्ध महासंघाच्या जिल्हासचिव उषा कांबळे, राजिपचे माजी समाज कल्याण सभापती सुभाष गवळे, भारिप चे तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र यादव, भाकप चे नेते गोपीनाथ ओव्हाळ, संविधान गौरव संघटनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड उपस्थित होते.
जागृत कष्टकरी संघटनेचे अशोक जंगले यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर साहित्यिक लक्ष्मण अभंगे, सुभाष गवळे, सचिन अभंगे, सुभाष गायकवाड, हरिश्चंद्र यादव, वसंत सुर्वे, गोपाळ शेळके, उषा कांबळे, गोपीनाथ ओव्हाळ यांनी आपल्या भाषणातून झालेल्या घटनेचा तीव्र निषेध केला. भारिपचे जिल्हाध्यक्ष दिपक मोरे यांनी झालेल्या घटनेचा निषेध करून केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारवर शाब्दिक हल्ला केला, जागृत कष्टकरी संघटनेच्या प्रमुख नॅन्सी गायकवाड यांनी आपण सर्वजन एकत्न नाही याचा फायदा उठविला जात आहे. झालेल्या घटनेच्या प्रकरणातील आरोपींना त्वरीत पकडा, अशी मागणी केली सूत्न संचालन वकील कैलास मोरे यांनी केले
कर्जत : जवखेडे मधील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ कर्जत शहरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. या घटनेचा निषेध म्हणून कर्जत तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
कर्जत मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निषेध मोर्चा निघाला. या वेळी निषेध सभेचे आयोजनही करण्यात आले होते. अॅड शैलेश पवार, अनंत सोनावणो, यशवंत जाधव, प्रमोद गायकवाड, यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्चा बाजार पेठेतून पोलीस ठाणो आणि कर्जत तहसीलवर धडकला.