मूलभूत सुविधांकडे झाले दुर्लक्ष

By Admin | Updated: January 14, 2015 23:08 IST2015-01-14T23:08:15+5:302015-01-14T23:08:15+5:30

मोठ्या प्रमाणावर दलित वस्ती असलेल्या ठाणे महापालिकेच्या शास्त्रीनगर, सहकार नगर या प्रभाग क्रमांक ९ मध्ये जवळपास २५ हजार नागरिक राहात आहेत.

Neglected to the basic features | मूलभूत सुविधांकडे झाले दुर्लक्ष

मूलभूत सुविधांकडे झाले दुर्लक्ष

नामदेव पाषाणकर, घोडबंदर
मोठ्या प्रमाणावर दलित वस्ती असलेल्या ठाणे महापालिकेच्या शास्त्रीनगर, सहकार नगर या प्रभाग क्रमांक ९ मध्ये जवळपास २५ हजार नागरिक राहात आहेत. शास्रीनगर, म्हाडा वसाहत, सहकारनगर, रामबाग, उपवन, शास्रीनगर नं.२, लक्ष्मी पार्क, एनजी विहार, विहंगपार्क, यशोधन नगर, दिलीप इंदिसे नगर, जानकीदेविनगर असा परिसर या प्रभागात मोडत आहे. इतर प्रभागाप्रमाणे येथेही गटारे, पायवाटा, स्वच्छतागृह, स्मशानभूमीची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधीसाठी वागळेच्या जयभवानीनगरला जावे लागते. येथील जमीन आदिवासी व खासगी मालकाची असून एसआरए योजना राबवली तरच रहिवाशांना सुगीचे दिवस येऊ शकतात़
शास्त्री नगर ते लक्ष्मी पार्ककडे जाणारा रस्ता अरु ंद असल्यामुळे अन् त्यावर फेरीवाले बसल्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. या रस्त्यावर कचरागाडी देखील उभी राहू शकत नाही. या विभागात ७० टक्के झोपड्या २० टक्के अनधिकृत इमारती आणि १० अधिकृत इमारती आहेत. शासकीय आरक्षण नसल्यामुळे नागरिकांसाठी सुविधांचा अभाव आहे. रामबाग, उपवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गाळ्यांमधून चालणारे अवैध व्यवसाय शासनाचा महसूल बुडवून गब्बर बनत असल्याचे दिसून आलेत. यातील असंख्य व्यावसायिकांनी शासनाकडून व्यवसाय परवाने घेतले नसल्याचे कामगार उपायुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. रामबाग स्मशानभूमीत मनपाचे कर्मचारी फिरकत नसल्यामुळे तेथे स्वच्छता होत नाही. स्मशानातील सोलर दिवे बंद पडले आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव काही अंत्यसंस्कार विद्युत दाहीनीवर उरकले जातात.तर काहीना वागळे स्मशानभूमी गाठावी लागते.

Web Title: Neglected to the basic features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.