Join us  

NEET Result 2020: नीटचा निकाल जाहीर, ओडिशाचा शोएब देशात पहिला, तर महाराष्ट्रात आशिष अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 10:27 PM

महाराष्ट्रातील आशिष अविनाश झान्ट्ये याने ७१० गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान मिळविले.

मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर झाला. त्यात ओडिशाचा शोएब आफताब व दिल्लीच्या आकांक्षा सिंग यांनी ७२० गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळविला. 

दरम्यान, महाराष्ट्रातील आशिष अविनाश झान्ट्ये याने ७१० गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान मिळविले. तर तेजोमय नरेंद्र वैद्य, पार्थ संजय कदम व अभय अशोक चिल्लरगे या तिघांनी ७०५ गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. देशातील सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या ५० विद्यार्थ्यांमध्ये उपरोक्त ४ जणांचा समावेश आहे. 

१३ सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी सदरील परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून सुमारे १५ लाख ९७ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. दिवसभर एनटीएचे सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊन निकाल हाती यायला उशीर झाला.

टॅग्स :नीट परीक्षेचा निकालमहाराष्ट्र