Join us

कला क्षेत्रासाठी हवे योग्य प्रशिक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 02:54 IST

अभिनेता जन्मावा लागतो, हे जरी खरे असले, तरी अंगभूत अभिनयकलेला अभ्यासाची जोड दिल्याशिवाय ही कला संपूर्णपणे विकास पावू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.

- संदीप गीध(करिअर मार्गदर्शक)अभिनय करता येणं ही एक मोठी कला आहे. अभिनयकलेचा छंद जोपासताना जर त्याला योग्य दिशा आणि योग्य दृष्टी दिली, तर हा छंद पूर्ण वेळचा व्यवसाय होऊ शकतो. अभिनेता जन्मावा लागतो, हे जरी खरे असले, तरी अंगभूत अभिनयकलेला अभ्यासाची जोड दिल्याशिवाय ही कला संपूर्णपणे विकास पावू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यासाठी राष्ट्रीय नाट्यशाळा (ठरऊ) दिल्ली - राष्ट्रीय नाट्य विद्यालय, बदावलपूर हाउस, भगवानदास रोड, नवी दिल्ली ११०००१.मुंबई विद्यापीठ - अकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्स, डॉ. आंबेडकर भवन, दुसरा मजला, विद्यानगरी, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०००९८.पुणे विद्यापीठ - ललित कला केंद्र, पुणे गुरुकुल, पुणे ४११००७.मराठवाडा विद्यापीठ - डिपार्टमेंट आॅफ ड्रॅमॅटिक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद या संस्था आहेतच; याशिवाय अनेक मान्यवर वेळोवेळी अभिनय प्रशिक्षण शिबिरे घेत असतात. त्याविषयीच्या जाहिराती वृत्तपत्रात येतात. योग्य व जाणकार मार्गदर्शकाच्या प्रशिक्षण शिबिरांचा खूप उपयोग होऊ शकतो. या क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रम चालविणाऱ्या काही संस्था पुढीलप्रमाणे आहेत-

(ब) व्हिसलिंगवूड इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फिल्म, टेलिव्हिजन अ‍ॅण्ड मीडिया आर्ट्स : सुभाष घई यांची व्हिसलिंगवूड इंटरनॅशनल ही चित्रपट, टेलिव्हिजन, अ‍ॅनिमेशन अ‍ॅण्ड मीडिया आर्ट्स या क्षेत्रांशी निगडित जागतिक दर्जाची शिक्षण - प्रशिक्षण संस्था आहे. १२वी उत्तीर्ण वा पदवीधारकांसाठी या संस्थेने दिग्दर्शन, छायाचित्रण, अभिनय, ध्वनिमुद्रण आणि डिझाइन, पटकथालेखन, बिझिनेस आॅफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन एडिटिंग, आर्ट अ‍ॅण्ड टेक्निक आॅफ अ‍ॅनिमेशन या विषयातील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांचा कालावधी : दोन वर्षांचा आहे. प्रवेश : अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट/ मुलाखत अर्जाची किंमत १,५०० रु.पत्ता : व्हिसलिंगवूड इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फिल्म, टेलिव्हिजन अ‍ॅण्ड मीडिया आर्ट्स, गोरेगाव, मुंबई.(क) झी इन्स्टिट्यूट आॅफ मीडिया आर्ट्स : या संस्थेतर्फे दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती व्यवस्थापन, संपादन, छायाचित्रणकला, लेखन, ध्वनी, फिल्म अ‍ॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स या विषयांचा समावेश असलेले अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.अर्हता : १२वी, निवड : स्पर्धा - परीक्षा, मुलाखत.पत्ता : झी इन्स्टिट्यूट आॅफ मीडिया आर्ट्स, मॅग्नम बंगलो सोसायटी, प्लॉट क्रमांक १७, युनिट - सी, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ५३.(ड) सत्यजीत राय फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट : ई.एम. बायपास रोड, पीओ पंचासयार, कोलकाता ७०००९४ (पश्चिम बंगाल)येथील पदव्युत्तर पदविका कोर्सेस खालीलप्रमाणेडायरेक्शन अ‍ॅण्ड स्क्रीनप्ले रायटिंगअर्हता : कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर किंवा समकक्ष; कालावधी : ३ वर्षे पूर्ण वेळ डिप्लोमा कोर्ससिनेमॅटोग्राफीअर्हता : कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर किंवा समकक्ष; कालावधी : ३ वर्षे पूर्ण वेळ डिप्लोमा कोर्सएडिटिंगअर्हता : कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर किंवा समकक्ष; कालावधी : ३ वर्षे पूर्णवेळ डिप्लोमा कोर्सआॅडिओग्राफीअर्हता : कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर किंवा समकक्ष; कालावधी : ३ वर्षे पूर्णवेळ डिप्लोमा कोर्सइ) फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिडन इन्स्टिट्यूट आॅफ तामिळनाडू, सीआयटी कॅम्पस, चेन्नई - ६००११३ (टी.एन.)कोर्सेस : डिप्लोमा इन डायरेक्शन आणि स्क्रीनप्ले रायटिंगअर्हता : पदवीधर; कालावधी : ३ वर्षेडिप्लोमा इन सिनेमॅटोग्राफ्रीअर्हता : एच.एस.सी. फिजिक्स आणि केमिस्ट्री विषय; कालावधी : ३ वर्षेडिप्लोमा इन साउंड रेकॉर्डिंग अ‍ॅण्ड साउंड इंजिनीअरिंगअर्हता : एच.एस.सी. फिजिक्स आणि केमिस्ट्री विषय; कालावधी : ३ वर्षेई) नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा(गव्हर्नमेंट आॅफ इंडिया, सांस्कृतिक मंत्रालय)बहावलपूर हाउस, भगवानदास रोड, नवी दिल्ली ११०००१.

टॅग्स :कलाशिक्षण क्षेत्र