Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कायदे वाचविण्याची गरज - जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 02:18 IST

देशातील कामगार क्षेत्रावर सध्या विविध संकटांचे सावट आहे. उद्योग टिकले, तर कामगार टिकतील, त्यामुळे उद्योग क्षेत्र टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

मुंबई : देशातील कामगार क्षेत्रावर सध्या विविध संकटांचे सावट आहे. उद्योग टिकले, तर कामगार टिकतील, त्यामुळे उद्योग क्षेत्र टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे लढे दिल्यानंतर विविध कायदे तयार करण्यात आले आहेत.हे कायदे वाचविले, तर कामगारांना न्याय मिळवून देणे यापुढेही शक्य होईल, त्यामुळे कामगार कायद्यांना वाचविणे ही सध्या काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांनी केले.महासंघाच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जीएसटी, नोटाबंदी यांसारख्या निर्णयांमुळे कामगार व कर्मचाऱ्यांना त्यांचे वर्षानुवर्षांचे रोजगार गमवावे लागले. लाखो नागरिकांचा रोजगार धोक्यात आल्यानंतर, देशात अराजकता निर्माण होण्याची भीती होती, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे जगताप म्हणाले.

टॅग्स :मुंबई