The need for the international community to work together for the empowerment of women - Dr. Neelam Gorhe | आंतरराष्ट्रीय समुदायाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता - डॉ नीलम गोऱ्हे 

आंतरराष्ट्रीय समुदायाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता - डॉ नीलम गोऱ्हे 

मुंबई : मिनिस्टर कौन्सेलर, ब्रिटीश हाय कमिशन श्रीमती कॅथी बज व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर जगावर व भारतावर  कोरोचे परिणाम व त्यावरील उपाय योजना याबाबत सविस्तर चर्चा व डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आजपर्यंतच्या महिलांच्या प्रश्न संदर्भातील कामकाज याबाबत बैठक झाली.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी  या महामारीमध्ये निर्माण झालेले अनेक प्रश्न विस्तृतपणे मांडले.  प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये महिलांना, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. यामध्ये महामारीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र आणि केंद्र शासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नमुळे भारतामध्ये महामारी लवकर आटोकाट आटोक्यात आणण्यास मोलाचे सहकार्य लाभले, असे त्यांनी सांगितले. 

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या विधिमंडळाच्या १९ वर्षामध्ये सभापती रामराजे नाईक निंबाळकर  व सर्व विधिमंडळ सदस्य महिलांच्या प्रश्नासंदर्भात अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगितले. जागतिक प्रश्नाकडे पाहताना महिलेच्याही दृष्टीकोनातून पाहावे व प्रगतीमध्ये कोणीही पाठीमागे राहू नये या युनोच्या या दशकाच्या ब्रीदवाक्याचा उल्लेख केला.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी  जेंडर बजेट मध्ये तरतूद केली. तसेच सुरक्षित पर्यटनाला पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्राधान्य दिले आहे. बीजिंग येथील १९९५ च्या जागतिक महिला परिषद आणि त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यामधील जेंडर इक्वलिटी यावरती त्यांनी भर दिला.  तसेच १ऑक्टोबर २०२० रोजीच्या वेबिनारमध्ये भाग घेऊन याबाबत विस्तृत विवेचन केल्याचेही सांगितले.

कॅथी बज मिनिस्टर कौन्सेलर ब्रिटिश हाय कमिशन  यांनी डॉ गोऱ्हे यांचा  काम करण्याचा आवाका व  त्यांनी महिलांच्या प्रश्नासंदर्भात केलेले  काम यांचे कौतुक केले.यांनी इंग्लंड आणि भारतामध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिस संदर्भात एक करार झाल्याचे सांगितले. तसेच इंग्लंड मध्ये आयुर्वेदिक मेडिसिनचा प्रचार करण्याच्या हेतूने इंग्लंड शासनाने विविध उपक्रम घेतल्याचेही सांगितले. जेंडर समानता व महिला सक्षमीकरण हे जागतिक  पातळीवर डॉ गोऱ्हे यांनी मांडलेले मुद्दे महत्वाचे आहेत असे त्या म्हणाल्या.  या बैठकीला ऍलन गेम्मेल उपउच्चायुक्त, कॅथरीन बर्न, डेप्युटी मिशन हेड, बेथ येट्स, फर्स्ट सेक्रेटरी पोलिटिकल अफेअर्स व सचिन निखार्गे हजर होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The need for the international community to work together for the empowerment of women - Dr. Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.