Join us  

इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षणाच्या प्रसाराची गरज- रतन टाटा  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 9:15 PM

रतन टाटा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मुंबई विद्यापीठाची सल्लागार परिषदेची पहिली बैठक

मुंबई - इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाचा अधिक प्रसार करण्याची गरज गुरुवारी रतन टाटा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन सल्लागार परिषदेत अधोरेखित करण्यात आली. कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शिक्षणक्षेत्रावर झालेले परिणाम तसेच कोरोनानंतरच्या परिस्थितीचा सामना करताना विद्यापीठाला तंत्रज्ञानाची मदत कशी घेता येईल ? संशोधनाला अधिक चालना देण्यासाठी समुह संशोधनाची कल्पना राबविण्यावर भर देण्याचेही या बैठकीत सुचविण्यात आले. ई-लर्निंग पद्धतीत सुधारणेसाठी शिक्षणतज्ज्ञांचा समुह तयार करण्यात यावा मात्र त्याचबरोबर नामांकित शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राध्यापकांना एडजंक्ट फॅकल्टी म्हणून आमंत्रण देण्यात यावे असा प्रस्ताव ही या बैठकीत चर्चेसाठी घेण्यात आला.विद्यापीठातील शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यासाठी  समितीमार्फत शासनास विनंती करून विद्यापीठातील संशोधनाला चालना देण्यासाठी येत्या बैठकीत विस्तृतपणे चर्चा करण्यात येणार आहे. गुरुवारी पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या या पहिल्या सल्लागार परिषदेसाठी अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्यासोबत ख्यातनाम शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, डेटामॅटिक्स समुहाचे अध्यक्ष डॉ. ललित कनोडिया यांच्यासह विद्यापीठातील मान्यवर उपस्थित होते.पुढील शैक्षणिक वर्षात नव्याने सुरुवात होणाऱ्या शैक्षणिक वेळापत्रकामध्ये महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ऑनलाईन माध्यमातून अध्ययन-अध्यापनाची पद्धती अमलांत आणताना घ्यावयाची काळजी तसेच या प्रणालीचे प्रमाण व स्वरूप कसे असावे यावर या तज्ज्ञ मंडळींनी चर्चा केली. तसेच विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांचे योगदान तसेच त्यांच्या क्षेत्रातील अनुभव आणि नैपुण्यतेचा उपयोग करुन घेण्यासाठी करावयाची कार्यपद्धती अशा विविध बाबींवर लक्ष देण्यात आले. विद्यापीठाच्या जागतिक पातळीवरील संशोधन, नवोपक्रम, नवसंकल्पनांवर भर देऊन देश-विदेशातील चांगली गुणवत्ता आकर्षित करण्यावर आणि आवश्यकता असलेल्या क्षेत्रात नविन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील ? विद्यापीठाची औद्योगिक क्षेत्रांशी सांगड घालताना करावयाची उपाययोजना यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.या देशासह विदेशातील परिवर्तीत होणाऱ्या शिक्षण पद्धतीत सर्वानुभवी, परिपक्व अशा महनीय पद्मविभूषण रतन टाटा आणि पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कोव्हिड-१९ नंतरच्या परिस्थितीत उच्च शिक्षणात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी विद्यापीठाच्या पुढील लघु आणि दीर्घ ध्येय-ध्येयधोरण निश्चितीसाठी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.  तसेच विद्यापीठाच्या जागतिक पातळीवरील संशोधन, नवोपक्रम, नवसंकल्पनांवर भर देऊन देश-विदेशातील चांगली गुणवत्ता आकर्षित करण्यावर गरजाधारीत आणि निकडीच्या क्षेत्रात नविन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी, जागतिक पातळीवर सहकार्य आणि या सर्वांसाठी आवश्यक भौतिक सुविधा तयार करण्यासाठी   -प्रा. सुहास पेडणेकर  

टॅग्स :मुंबई विद्यापीठरतन टाटा