शिक्षण क्षेत्रात होणारे बदल स्वीकारण्याची गरज

By Admin | Updated: September 6, 2015 00:52 IST2015-09-06T00:52:59+5:302015-09-06T00:52:59+5:30

जगात होत असलेले नवनवीन बदल अंगी बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजाची मानसिकता तयार करायला हवी. बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणपद्धतही बदलण्याची गरज असून त्याकरिता

The need to accept changes in education sector | शिक्षण क्षेत्रात होणारे बदल स्वीकारण्याची गरज

शिक्षण क्षेत्रात होणारे बदल स्वीकारण्याची गरज

ठाणे : जगात होत असलेले नवनवीन बदल अंगी बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजाची मानसिकता तयार करायला हवी. बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणपद्धतही बदलण्याची गरज असून त्याकरिता शिक्षण क्षेत्राने नवीन बदल स्वीकारण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केली.
येथील गडकरी रंगायतनमध्ये शनिवारी आयोजित सोहळ््यात राज्यातील १०५ शिक्षक व शिक्षिकांना ‘राज्य शिक्षक पुरस्कार’ देऊन मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षण व उच्चतंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आदर्श पुरस्कार मिळाल्यामुळे समाज, विद्यार्थी घडवण्याच्या शिक्षकांच्या जबाबदारीतही वाढ झाली आहे. शिक्षकांनी जबाबदारीचे भान राखून कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. त्यांच्या मंजूरही झाल्या पाहिजेत. परंतु, त्यामध्ये आपले हित किती आहे. समाजाचे, विद्यार्थ्यांचे किती हित आहे, याचेही भान राखले पाहिजे, असा चिमटाही त्यांनी या वेळी काढला. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, ठाण्याचे महापौर संजय मोरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The need to accept changes in education sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.