कळंबोली पुलाजवळ तेलाचा टँकर घसरला
By Admin | Updated: March 1, 2015 00:37 IST2015-03-01T00:37:47+5:302015-03-01T00:37:47+5:30
मुंबईहून कोल्हापूरला फर्निश आॅइल घेऊनचा जाणारा एमएच ०४ ईवाय ५३९२ क्रमाकांचा टँकर कळंबोली शाखा येथे पुलाजवळ शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास घसरला.

कळंबोली पुलाजवळ तेलाचा टँकर घसरला
पनवेल : मुंबईहून कोल्हापूरला फर्निश आॅइल घेऊनचा जाणारा एमएच ०४ ईवाय ५३९२ क्रमाकांचा टँकर कळंबोली शाखा येथे पुलाजवळ शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास घसरला. रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर चालकाने अर्जंट ब्रेक मारल्याने हा अपघात घडला. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
दिवसभर रिमझीम पाऊस पडत असल्याने अर्जंट मारलेला ब्रेक टँकर चालकाच्या अंगाशी आला. ज्यामुळे टँकर उलटला आणि टँकरमधील जवळपास २३ हजार लीटर फर्निश आॅइल पुलावर पसरले. यामुळे या ठिकाणी अनेक मोटारसायकल स्वारांची घसरगुंडी झाली. दरम्यान टँकर चालक हुसेन सुदैवाने बचावला. घटनास्थळी कळंबोली अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेऊन आॅइल स्वच्छ करण्यासाठी उपाययोजना केल्या. मात्र पावसामुळे आॅइल समजण्यास अडथळे येत
होते. (वार्ताहर)