आयआरबीमुळे पुणे आले जवळ

By Admin | Updated: August 18, 2015 01:41 IST2015-08-18T01:41:57+5:302015-08-18T01:41:57+5:30

मुंबई - पुणे जुन्या महामार्गाची दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी आयआरबीकडे आहे. प्रवाशांना रस्ते आणि गावांचे अंतर माहिती होण्यासाठी

Near IRB due to Pune | आयआरबीमुळे पुणे आले जवळ

आयआरबीमुळे पुणे आले जवळ

खालापूर : मुंबई - पुणे जुन्या महामार्गाची दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी आयआरबीकडे आहे. प्रवाशांना रस्ते आणि गावांचे अंतर माहिती होण्यासाठी अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या सूचना फलकांमुळे चांगलाच गोंधळ निर्माण होत आहे. खालापूर तालुक्यात चौक गावाजवळ असलेल्या सूचना फलकावर पुण्याचे अंतर इंग्रजीत ९२ तर मराठीमध्ये २९ किमी असे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हे अंतर नक्की किती, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. त्यामुळे सूचना फलकांवरील गावांची नावे व किमीचे अंतर मजकूर चुकल्यामुळे बदलण्यात यावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

Web Title: Near IRB due to Pune