राष्ट्रवादीची सीरिअलवाल्यांना समज

By Admin | Updated: May 3, 2014 14:57 IST2014-05-03T13:23:36+5:302014-05-03T14:57:25+5:30

काशिमिर्‍याच्या माशाचापाडा परिसरात असलेल्या क्लासिक स्टुडिओमध्ये राष्ट्रवादी (एनसीपी) काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दोन आठवड्यांपूर्वी एका सीरिअलमध्ये विनोद करण्यात आला होता.

NCP's syllabary understanders | राष्ट्रवादीची सीरिअलवाल्यांना समज

राष्ट्रवादीची सीरिअलवाल्यांना समज

भाईंदर : काशिमिर्‍याच्या माशाचापाडा परिसरात असलेल्या क्लासिक स्टुडिओमध्ये राष्ट्रवादी (एनसीपी) काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दोन आठवड्यांपूर्वी एका सीरिअलमध्ये विनोद करण्यात आला होता. त्यावर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या वांद्रे येथील पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी दुपारी ३च्या सुमारास स्टुडिओवर धडक दिली. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रॉडक्शन मॅनेजरला एनसीपीच्या पदाधिकार्‍यांनी समज देऊन असा प्रकार भविष्यात न करण्याबाबत सांगितल्याचे स्टुडिओचे मालक एहजाज खान यांनी सांगितले. परंतु एनसीपीच्या संतप्त पदाधिकार्‍यांनी स्टुडिओमध्ये राडा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली असली तरी त्याला दुजोरा मिळाला नाही़ त्याप्रकरणी स्थानिक पोलिसांतही नोंद नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's syllabary understanders