महापौरांच्या विधानावर राष्ट्रवादीचा आक्षेप
By Admin | Updated: July 22, 2015 01:04 IST2015-07-22T01:04:13+5:302015-07-22T01:04:13+5:30
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘हिटलर’ संबोधून घटनात्मक पदाचा अपमान केला आहे

महापौरांच्या विधानावर राष्ट्रवादीचा आक्षेप
मुंबई : मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘हिटलर’ संबोधून घटनात्मक पदाचा अपमान केला आहे. मुंबईच्या महापौरांचे विधान चुकीचे असून, त्याबद्दल राज्य सरकारने निवेदन करावे, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची चांगलीच कोंडी केली.
राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी महापौरांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान पद हे घटनात्मक पद असून,
अशा पदावरील व्यक्तीला हिटलर संबोधणे चुकीचे आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा मलिन होते.