Join us
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत राष्ट्रवादीचे नवाब मलिक नको; भाजप-शिंदेसेनेची भूमिका, दोन्ही पक्षांची जागावाटपाची पहिली फेरी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 07:54 IST

मलिक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यांच्यासोबत भाजप युती करणार नाही, असे भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले.

मुंबई : अजित पवार गटाचे नेतृत्व मुंबईत नवाब मलिक करणार असतील तर त्यांचा पक्ष महायुतीत नसेल. मलिक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यांच्यासोबत भाजप युती करणार नाही, असे भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले, हाच धागा पकडत शिंदेसेनेचीसुद्धा हीच भूमिका असल्याचे माजी खा. राहुल शेवाळे म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणूक भाजप-शिंदेसेना मुंबई एकत्र निवडणूक लढणार असून मंगळवारी झालेल्या चर्चेच्या पहिल्या फेरीत अजित पवार गटाला महायुतीतून वगळण्यात आले. मुंबईत १५० पेक्षा अधिक जागा निवडून आणायच्या आणि महायुतीचा महापौर विराजमान करण्याचा निर्धार मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी यावेळी व्यक्त केला तर महापौर मराठीच बसवणार, अशी भूमिका शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मांडली.

महायुतीची बैठक दादर पूर्वेकडील मुंबई भाजप कार्यालयात झाली. यावेळी भाजपकडून मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, आ. अतुल भातखळकर आणि आ. प्रवीण दरेकर तर, शिंदेसेनेकडून माजी खा. राहुल शेवाळे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आ. प्रकाश सुर्वे आणि पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपस्थित होत्या. घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली असून रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाशी आणि त्यानंतर शिंदेसेनेच्या नेत्यांशी चर्चा झाल्याची माहीती साटम यांनी दिली. महायुतीच्या १५० जागा जिंकून आणणे आणि मुंबईत मराठी महापौर बसविण्याचा निर्धार केला आहे. पुढची बैठक १८ डिसेंबरला होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP, Shinde Sena Reject Nawab Malik in Alliance; Seat Talks Begin

Web Summary : BJP and Shinde Sena oppose Nawab Malik's inclusion in the alliance. Seat-sharing talks began, excluding Ajit Pawar's group. The alliance aims to win over 150 Mumbai seats and install a Marathi mayor. Next meeting on December 18th.
टॅग्स :नवाब मलिकअमित साटम