राष्ट्रवादीची उरलीसुरली आशाही संपली!

By Admin | Updated: October 28, 2014 00:45 IST2014-10-28T00:45:24+5:302014-10-28T00:45:24+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुरब्बी राजकारणी नवाब मलिक यांचा अभेद्य गड मानला जाणारा अणुशक्तीनगर हा बालेकिल्ला शिवसेनेने हिसकावून घेतला आहे.

NCP's hopeless prospect was over! | राष्ट्रवादीची उरलीसुरली आशाही संपली!

राष्ट्रवादीची उरलीसुरली आशाही संपली!

पूजा दामले - मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुरब्बी राजकारणी नवाब मलिक यांचा अभेद्य गड मानला जाणारा अणुशक्तीनगर हा बालेकिल्ला शिवसेनेने हिसकावून घेतला आहे. मितभाषी पण आक्रमक अशी छबी असलेले नवाब मलिक यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. 
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढतीत 1क्क्7 मते जास्त मिळवून शिवसेनेचे तुकाराम काते यांनी आमदारकी मिळवली. अणुशक्तीनगरमध्ये एकूण 15 उमेदवार रिंगणामध्ये होते. यापैकी 5 उमेदवार अपक्ष होते. या मतदारसंघामध्ये आघाडीची मते आणि मुस्लीम मतांची विभागणी झाल्याचा फटका नवाब मलिक यांना बसला असून, मराठी मतदारांची एकगठ्ठा मते मिळाल्याने शिवसेनेचे तुकाराम काते यांनी विजय संपादन केला. 
हा मतदारसंघ दलित, मुस्लीमबहुल असून मतदारसंघाचा काही भाग झोपडपट्टीचा आहे. अनेक भागांत अजूनही प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच अनेक मोठमोठे कारखाने असल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न येथे कळीचा आहे. लोकसभा  निवडणुकीत आघाडी आणि युती एकत्र लढले होते. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांचे या भागात चांगले वर्चस्व आहे. यामुळे येथे युती तुटल्यावरही त्याचा फायदा शिवसेनेने अचूक उचलला. राष्ट्रवादी काही प्रमाणात गाफील राहिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. 
आघाडी तुटल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात मोठी मतविभागणी झाली. याचबरोबरीने पिसन्ट्स अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ  इंडियाचे अकबर हुसेन आणि 2 अपक्ष उमेदवार हे मुस्लीम होते. त्यामुळे मुस्लीम मतांचे विभाजन झाले. याचबरोबरीने दलित, परप्रांतीयांची मतेही विभागली गेली. तिथल्या मराठी मतांनी मात्र युती तुटल्यावर देखील शिवसेनेला पसंती दिल्याचे दिसून आले. मलिक यांना आघाडी तुटल्याचा फटका बसला आहे.   
 युती तुटल्यामुळे शिवसेनेचे काते तर भाजपाचे विठ्ठल खरटमोल हे आमनेसामने उभे ठाकले होते. खरटमोल हे याच भागातून माजी नगरसेवक होते, तर त्यांची पत्नी सध्या नगरसेविका आहे.  अणुशक्तीनगरच्या काही भागांमध्ये शिवसेना, भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र खरटमोल यांना मिळालेल्या मतांचा परिणाम शिवसेनेच्या मतांवर न होता अधिक प्रमाणात मनसेच्या मतांवर झाल्याचे दिसून आले. 
या विभागातून मनसेच्या वीणा उकरंडे यांना फक्त 3 हजार 285 मते मिळालेली आहेत, तर विठ्ठल खरटमोल यांना 23 हजार 767 मते मिळाली तसेच अकबर हुसेन यांनी 4 हजार 91क् मते मिळवली आहेत.
 
अणुशक्तीनगर मतदारसंघामध्ये अनेक मतदारांना आघाडी तुटल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे वेगवेगळे लढत आहेत याची पूर्णत: कल्पना नव्हती. यामुळे लोकसभेला हाताच्या पंजाला मत दिले होते, या वेळी ही नवाब मलिक यांनाच मतदान करायचे आह़े म्हणून हाताच्या पंजाला मतदान केले, तरी देखील तुम्ही कसे पडले, असा प्रश्न अनेकांनी मलिक यांना विचारल्याने तेच काही वेळ बुचकाळ्य़ात पडल्याचे दिसून आले.

 

Web Title: NCP's hopeless prospect was over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.