विधान परिषदेच्या सभापतीपदावर राष्ट्रवादीचा डोळा

By Admin | Updated: October 4, 2014 02:15 IST2014-10-04T02:15:22+5:302014-10-04T02:15:22+5:30

विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही, तर निदान विधान परिषदेचे सभापतीपद आपल्याकडे घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रय} असेल.

NCP's eye on the Legislative Council election | विधान परिषदेच्या सभापतीपदावर राष्ट्रवादीचा डोळा

विधान परिषदेच्या सभापतीपदावर राष्ट्रवादीचा डोळा

>यदु जोशी - मुंबई
विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही, तर निदान विधान परिषदेचे सभापतीपद आपल्याकडे घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रय} असेल. सध्याचे सभापती शिवाजीराव देशमुख यांना हटवून आपला सभापती आणण्याच्या हालचाली राष्ट्रवादीकडून होऊ शकतात. 
2क्क्9च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 82 तर राष्ट्रवादीचे 62 आमदार निवडून आले होते. विधानसभेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली. तर काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांना उपसभापतीपद मिळाले. काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख यांना विधान परिषदेचे सभापतीपद तर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांना उपसभापतीपद मिळाले होते.  आघाडी असल्याने दोन्ही पक्षांनी पदे वाटून घेतलेली होती. आता आघाडी तुटलेली असल्याने काँग्रेसला पाठिंबा देणो राष्ट्रवादीवर आघाडीधर्म म्हणून बंधनकारक नाही. विधान परिषदेत आमचे संख्याबळ काँग्रेसपेक्षा अधिक आहे, असे राष्ट्रवादीकडून सांगितले जात आहे. अरुणकाका जगताप व दत्तात्रय सावंत या दोन अपक्ष सदस्यांच्या मदतीने राष्ट्रवादीचे बळ 3क् इतके आहे. विधान परिषदेत 78 सदस्य आहेत. निवडणूक निकालानंतर कोण कोणाचा मित्र असतो यावर विधान परिषदेतील संख्याबळाची समीकरणो बदलतील. विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेससोबत न गेल्यास राष्ट्रवादीची नजर सभापतीपदावर असेल, असे म्हटले जाते. 

Web Title: NCP's eye on the Legislative Council election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.