Join us

येरे येरे पावसा...आम्ही खातो पैसा; राष्ट्रवादीचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा 

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 25, 2023 20:01 IST

"येरे येरे पावसा,तुला देतो पैसा...पाऊस आला मोठा,पैसा झाला खोटा" अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

मुंबई-बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार आगमन झाले.यंदाच्या पहिल्याच मान्सूनचे काल मुंबईत आगमन होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि नेहमीप्रमाणे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत होऊन मुंबईकरांची तर दाणादाण उडाली."येरे येरे पावसा,तुला देतो पैसा...पाऊस आला मोठा,पैसा झाला खोटा" अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

मुंबईच्या पहिल्याच पावसात राज्य सरकारने व बीएमसी प्रशासनाने ९६ हजार कोटींची एफडी मोडून मुंबईत केलेली नालेसफाई व गटारसफाई कुठे वाहत गेली ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. यामुळे आता राज्यसरकारचा आणि पालिकेचा खोटारडेपणा व निष्काळजीपणा समोर आला असल्याचे मत देखील त्यांनी मांडले आहे.

 अंधेरी सबवे भागात पहिल्याच पावसात डोळ्यादेखत गाड्या गेल्या वाहून. तर सायन परिसरात रस्त्यावर तुडूंब पाणी साचले होते.या पावसामुळे मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे फोल ठरले असून धादांत खोटं बोलणारं हे सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान,मुख्यमंत्री शिंदेना याबाबत विचारणा केली असता,ते म्हणतात पावसाचे स्वागत करा,मात्र ९६ हजार कोटीची एफडी मोडून मुंबईत केलेली नालेसफाई व गटारसफाई कुठे वाहत गेली ? याच उत्तर द्यायला ते तयार नाही.त्यामुळे आता ये-रे ये-रे पावसा,आम्ही खातो पैसा...पाऊस आला मोठा,पैसा झाला खोटा, असं म्हणायची वेळ मुंबईकरांवर आली असल्याची टिका ॲड.अमोल मातेले यांनी केली. 

टॅग्स :पाऊसमुंबई