राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक नियाझ वणू यांचे निधन
By जयंत होवाळ | Updated: May 17, 2024 19:18 IST2024-05-17T19:18:16+5:302024-05-17T19:18:36+5:30
Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील माजी गटनेते आणि माजी नगरसेवक नियाझ वणू यांचे नुकतेच निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. ते ७६ वर्षांचे होते.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक नियाझ वणू यांचे निधन
- जयंत होवाळ
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील माजी गटनेते आणि माजी नगरसेवक नियाझ वणू यांचे नुकतेच निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. ते ७६ वर्षांचे होते.
सन १९७८ सालापासून ते वडाळा ॲन्टाॅप हिल येथून अपक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पालिकेत निवडून येत होते. १९७८,१९८५, १९९२, १९९७, २००७ सालापासून ते पालिकेत प्रतिनिधित्व करत होते. वणू हे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जात. विविध नागरी समस्यांची त्यांना जाण होती. पालिकेच्या १८८८ च्या कायद्याचा त्यांचा उत्तम अभ्यास होता.