Join us  

शरद पवार दिल्लीत, विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार; राजकीय वर्तुळात अर्थ काढण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 7:22 AM

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार दिल्लीत गेले असून ते विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांना भेटणार आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारदिल्लीत गेले असून ते विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांना भेटणार आहेत. आजारपणानंतर  पवार दिल्लीत गेलेच नव्हते. मध्यंतरी दोन वेळा त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना डॉक्टरांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. प्रकृती व्यवस्थित झाल्याने त्यांनी लांबवलेली दिल्ली भेट आता केली आहे. यातून कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढू नये, असे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

मुख्यमंत्री ठाकरे यांची दिल्ली भेट, नंतर शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेले पत्र, या पार्श्वभूमीवर पवार यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढणे सुरू झाले. त्यावर मलिक म्हणाले की, याचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. पक्षाचे नेते पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याच्या दौर्‍यावर तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत.

आजारपणानंतर शरद पवार दिल्लीत

पहिल्यांदा जात आहेत. मध्यंतरी विरोधी पक्षनेत्यांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी घेतली होती. त्याच अनुषंगाने ते काही विरोधी पक्षनेत्यांना भेटतील.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसदिल्ली