Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीचा विनयभंग करणारा राष्ट्रवादीचा पदाधिकारी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:44 IST

पंजाबी अभिनेत्रीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि व्यावसायिक विश्वनाथ शेट्टी यास अंबोली पोलिसांनी अटक केली आहे.

- मनीषा म्हात्रेमुंबई : पंजाबी अभिनेत्रीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि व्यावसायिक विश्वनाथ शेट्टी यास अंबोली पोलिसांनी अटक केली आहे.अंधेरीतील एका नामांकित जीममध्ये झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत शेट्टीने पंजाबी अभिनेत्रीस अश्लील मेसेज पाठवले. या प्रकारामुळे अभिनेत्रीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले. मात्र १३ फेब्रुवारी रोजी ती नेहमीप्रमाणे जीममध्ये आली असता, शेट्टीने तिच्याशी अश्लील संभाषण केले. शिवीगाळ करत तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा अभिनेत्रीचा आरोप आहे. या प्रकरणी अभिनेत्रीच्या तक्रारीवरून शेट्टी विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तो फरार झाला होता. दरम्यान, शेट्टीविरोधात ओशिवरामध्येही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. तेथेही एका तरुणीला त्याने अश्लील मेसेज केले होते. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. बुधवारी तो मुंबईत दाखल होताच अंबोली पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हा