सेनेकडून राष्ट्रवादीस मानाचे पद

By Admin | Updated: June 3, 2015 04:30 IST2015-06-03T04:30:06+5:302015-06-03T04:30:06+5:30

अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता असतांनाही सभापतीपदांचे वाटप करतांना राष्ट्रवादीला आणि अपक्ष नगरसेवकाल महत्त्वाचे सभापतीपद

NCP leader's honorable post | सेनेकडून राष्ट्रवादीस मानाचे पद

सेनेकडून राष्ट्रवादीस मानाचे पद

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता असतांनाही सभापतीपदांचे वाटप करतांना राष्ट्रवादीला आणि अपक्ष नगरसेवकाल महत्त्वाचे सभापतीपद देण्यात आले आहे. तर दुय्यम खाती हे शिवसेना नगरसेवकांना देण्यात आले आहे. शिवसेनेला अपक्ष आणि राष्ट्रवादीने समर्थन दिल्याने शिवसेनेला ही भूमिका घ्यावी लागली आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या पाच विषय समितीच्या सभापतीपदांची निवडणूक मंगळवारी दुपारी घेण्यात आली. त्यात सर्व सभापतींची निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, सभापतीपदांचे वाटप करतांना शिवसेनेने स्वत:च्या नगरसेवकांना दुय्यम सभापतीपद दिले आहे. तर त्यांना समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीचे गटनेते सदाशिव पाटील यांना सर्वात महत्वाचे असे बांधकाम सभापतीपद दिले आहे. तर दुसरे महत्वाची समिती असलेल्या पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी अपक्ष नगरसेवक सुभाष साळुंखे याची वर्णी लावली आहे. ते शिवसेनेचे पदाधिकारी होते. मात्र निवडणूकीत त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळविला होता. सत्ता स्थापनेते त्यांनी सर्वप्रथम शिवसेनेला समर्थन देऊन पाणीपुरवठा सभापतीपद मिळविले आहे. हे दोन महत्वाचे समिती वगळता शिवसेनेने आरोग्य समितीच्या सभापतीपदी वीणा उगले, शहर नियोजन समिती सभापतीपदी राजेंद्र बागुल, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी जोत्स्रा भोईर आणि शिक्षण समितीहे पदसिध्द सभापती हे उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: NCP leader's honorable post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.