Join us
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने चार जिल्हाध्यक्ष बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:04 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांनी संघटनात्मक फेरबदल सुरू केले असून चार जिल्हाध्यक्ष बदलून त्या जागी नवे चेहरे आणले आहेत.

मुंबई - राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांनी संघटनात्मक फेरबदल सुरू केले असून चार जिल्हाध्यक्ष बदलून त्या जागी नवे चेहरे आणले आहेत. रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी बाबाजी जाधव, मीरा-भार्इंदर - प्रकाश दुबोले, पुणे ग्रामीण - प्रदीप गारटकर तर गोंदियाच्या जिल्हाध्यक्षपदी पंचम बिसेन यांची नियुक्ती केली आहे. उर्वरित जिल्हाध्यक्षांना तीन वर्षांची मुदतवाढ दिली आहे.मुदतवाढ मिळालेल्या जिल्हाध्यक्षांची नावे अशी - प्रमोद घोसाळकर (रायगड), अनंत सुतार (नवी मुंबई), सुनील भुसारा (पालघर), सुनील माने (सातारा), विलासराव शिंदे (सांगली ग्रामीण), यासह अन्य काही जिल्हाध्यक्षांना मुदतवाढ मिळाल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसराजकारण