काँग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीचा दावा
By Admin | Updated: September 14, 2014 01:55 IST2014-09-14T01:55:04+5:302014-09-14T01:55:04+5:30
आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील 2 आणि ठाणो, पुणो, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिकमधील प्रत्येकी 1 आदी काँग्रेसच्या मतदारसंघावर दावा सांगितला आहे.

काँग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीचा दावा
यदु जोशी - मुंबई
आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील 2 आणि ठाणो, पुणो, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिकमधील प्रत्येकी 1 आदी काँग्रेसच्या मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
2क्क्9च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मुंबईतील 7 जागा लढविल्या होत्या आणि 3 जिंकल्या होत्या. या वेळी वांद्रे पूर्व आणि शिवाजीनगर मानखुर्द या दोन जागा राष्ट्रवादीकडून मागण्यात आल्याचे समजते. वांद्रे पूर्वमध्ये बाळा सावंत हे शिवसेनेचे आमदार आहेत, तर शिवाजीनगर-मानखुर्दमध्ये समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी आमदार आहेत.
ठाणो शहर विधानसभेची जागा राष्ट्रवादीला हवी असून तिथे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे किंवा त्यांचे पुत्र निरंजन यांना निवडणुकीत उतरविण्याचा पक्षाचा विचार आहे. नाशिक शहरातील नाशिक पूर्वची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. बाजूच्या धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण या जागेवर राष्ट्रवादी दावा करू शकते. माजी मंत्री रोहिदास पाटील आणि त्यांचे पुत्र कुणाल यांनी या ठिकाणी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांच्यासाठी ही जागा मागितली जाऊ शकते.
अहमदनगरमध्ये शहराच्या जागेवरही राष्ट्रवादीची नजर आहे. तेथे महापौर संग्राम जगताप यांच्यासाठी ही जागा त्यांना हवी आहे. येथे गेल्या पाच निवडणुकीपासून काँग्रेसचा पराभव होत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे अपक्ष आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील राष्ट्रवादीकडून लढू शकतात. त्या परिस्थितीत काँग्रेसकडील ही जागा राष्ट्रवादी मागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रrापुरीच्या जागेवरून जबरदस्त रस्सीखेच होऊ शकते. तेथे गेल्या वेळी दुस:या क्रमांकावर राहिलेले अपक्ष संदीप गड्डमवार आता राष्ट्रवादीत आहेत आणि त्यांच्यासाठी पक्षाला ही जागा हवी आहे. दुसरीकडे माजी राज्यमंत्री काँग्रेसचे विजय वडेट्टीवार चिमूरऐवजी या वेळी ब्रrापुरीतून लढतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ही जागा आपल्याकडे ठेवणो प्रतिष्ठेचे आहे.
वर्धा शहर मतदारसंघात गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले सुरेश देशमुख यांच्यासाठी राष्ट्रवादीला ही जागा हवी आहे. वर्धेची जागा सोडण्यास काँग्रेस अजिबात तयार नाही. ती काँग्रेसकडेच राहिली तर देशमुख पुन्हा एकदा अपक्ष लढतील, असे मानले जाते. बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा शहर ही जागा राष्ट्रवादी मागू शकते.
परळीत मुंडेविरुद्ध मुंडे!
बीड जिल्ह्यातील परळीची जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीला हवी आहे ती धनंजय मुंडे यांच्यासाठी. तिथे पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. कोल्हापुरात उत्तर कोल्हापूर आणि शिरुळच्या जागेवर राष्ट्रवादीची नजर आहे. शिरुळमध्ये काँग्रेसचे आमदार असल्याने उत्तर कोल्हापूरवर राष्ट्रवादीचा भर असेल.
भुजबळांचे स्वीय सहायक
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडाची जागा काँग्रेसकडे असली, तरी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे माजी स्वीय सहायक संदीप बेडसे यांच्यासाठी राष्ट्रवादीने ही जागा मागितली आहे, तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरची जागा काँग्रेसकडे असताना अलीकडेच राष्ट्रवादीमध्ये आलेले शरद गावित यांच्यासाठी ती राष्ट्रवादीला हवी आहे.
पश्चिम नागपूरही हवी
पश्चिम नागपूर मतदारसंघावरही राष्ट्रवादीने दावा सांगितल्याचे समजते. या मतदारसंघात काँग्रेसकडून मंत्री राजेंद्र मुळक आणि विकास ठाकरे इच्छुक आहेत. नागपुरातील किमान एकतरी जागा मिळावी असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे.