Join us

मुंबईमध्ये NCB ची मोठी कारवाई! २०० कोटींचे ड्रग्स जप्त; चार आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:41 IST

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ११.५४० किलोग्रॅम उच्च दर्जाचे कोकेन, ४.९ किलोग्रॅम हायब्रिड स्ट्रेन, गांजा, २०० पॅकेट कॅनबिस जप्त केले आहे.

एनसीबीने नवी मुंबईत एनसीबीने मोठी कारवाई केली असून चार आरोपींना अटक केली. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल आता ॲक्शनमोडवर आले आहे. कडक कारवाई करत मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने फक्त चार जणांना अटक केली नाही तर त्यांच्याकडून विविध प्रकारचे ड्रग्ज देखील जप्त केले. या ड्रग्जची एकूण किंमत सुमारे २०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने ११.५४० किलो उच्च दर्जाचे कोकेन, ४.९ किलो हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक चरस/गांजा, २०० पॅकेट गांजा जप्त केला आहे.

याआधी एनसीबीने जानेवारी महिन्यात कारवाई केली होती. त्यावेळी फक्त २०० ग्रॅम कोकोन जप्त केले होते, त्यावेळी मोठ्या साठ्याची एनसीबीलाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, एनसीबी मुंबई टीमने पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली.

एनसीबीला तांत्रिक माध्यमातून तस्करीच्या स्रोतापर्यंत पोहोचण्यात यश आले. ३१ जानेवारी रोजी नवी मुंबईतून पथकाने ११.५४० किलो उच्च दर्जाचे कोकेन, ४.९ किलो हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक चरस/गांजा आणि २०० पॅकेट कॅनॅबिस गमी आणि १,६०,००० रुपये रोख जप्त केले.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय कुरिअर एजन्सीकडून एक पार्सल सापडले. हे पार्सल ऑस्ट्रेलियाला पाठवायचे होते. एनसीबीने तपास पुढे नेला तेव्हा यातील आणखी ड्रग्ज नवी मुंबईमध्ये लपवल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :अमली पदार्थमुंबई