एनसीबीची अर्जुन रामपालकडे आज पुन्हा चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:24 IST2020-12-16T04:24:38+5:302020-12-16T04:24:38+5:30
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : हजर राहण्यासाठी समन्स जारी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल ...

एनसीबीची अर्जुन रामपालकडे आज पुन्हा चौकशी
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : हजर राहण्यासाठी समन्स जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल याची अमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (एनसीबी) पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. त्याला बुधवारी कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स जारी करण्यात आले.
एनसीबीने दीड महिन्यापूर्वी त्याच्या घरावर छापा टाकून मोबाइल, लॅपटॉप, टॅब जप्त केले होते. त्याची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सची सलग दोन दिवस तर रामपालची एकदा स्वतंत्रपणे कसून चाैकशी करण्यात आली आहे. त्याच्या चालकालाही ताब्यात घेऊन विचारणा करण्यात आली होती. त्यापूर्वी गॅब्रिएलाचा भाऊ अंजिलीयसला ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक केली होती.
अर्जुन रामपालच्या चौकशीत त्याने काही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्याची कबुली दिली होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अटक केलेल्या तस्करांकडून त्याच्याबाबत आणखी काही माहिती एनसीबीच्या हाती लागली. त्यानुसार त्याला चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स जारी करण्यात आले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलीवूडचे ड्रग्ज संबंध चव्हाट्यावर आले आहेत.
.......................