गँगस्टर राझिक चिकनाला एनसीबीचे समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:06 IST2021-04-13T04:06:37+5:302021-04-13T04:06:37+5:30
अमली पदार्थांची तस्करी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमली पदार्थ नियंत्रक कक्षाने (एनसीबी) गँगस्टर राझिक चिकनाला ...

गँगस्टर राझिक चिकनाला एनसीबीचे समन्स
अमली पदार्थांची तस्करी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रक कक्षाने (एनसीबी) गँगस्टर राझिक चिकनाला चौकशीला हजर रहाण्याबाबत समन्स जारी केले. मादक पदार्थची तस्करी करण्यात त्याचा सहभाग असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राझिक हा अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असून, त्याच्या टोळीकडून अमली पदार्थाच्या तस्करीचा व्यवहार पाहत असल्याचे सांगितले जाते.
एनसीबीने गेल्या आठवड्यात राझिकचा भाऊ दानिश चिकनाला गेल्या आठवड्यात राजस्थानमधून अटक करून मुंबईत आणले. सध्या तो एनसीबीच्या ताब्यात आहे. तो दाऊद टोळीचा मोहरक्या आणि भाऊ राझिकच्या सूचनेनुसार डोगरीत ड्रग्जचा कारखाना चालवित होता. त्याच्या गाडीतून मोठ्या प्रमाणात मादक द्रव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय एका हत्येसह सहा गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.