नायगाव झाले अनधिकृत बांधकामाचे केंद्र
By Admin | Updated: December 17, 2014 23:19 IST2014-12-17T23:19:18+5:302014-12-17T23:19:18+5:30
विरार-नालासोपारा मागोमाग नायगावही आता अनधिकृत बांधकामाचे केंद्र ठरू लागले आहे. शासकीय, वन तसेच आदिवासी जमिनीवर मोठ्या

नायगाव झाले अनधिकृत बांधकामाचे केंद्र
वसई : विरार-नालासोपारा मागोमाग नायगावही आता अनधिकृत बांधकामाचे केंद्र ठरू लागले आहे. शासकीय, वन तसेच आदिवासी जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहू लागली आहेत. सागरी नियंत्रण कायदा भंग करण्याच्या तसेच खारफुटीची सरसकट कत्तल करण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. खारफुटी कत्तल प्रकरणी अनेक विकासकामांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही. अनधिकृत बांधकामाचे केंद्र म्हणून नालासोपारा शहराची एकेकाळी ओळख होती. आजही ती कायम आहे. परंतु आता चाळमाफियांनी नायगाव परिसराला लक्ष केले आहे. नायगाव पश्चिम. नायगाव पश्चिमेस अनेक विकासक खाडी किनारी सागरी नियंत्रण कायदा धाब्यावर बसवून बांधकामे करीत आहेत. ही बांधकामे करताना अडथळा ठरणाऱ्या खारफुटीची सरसकट कत्तल होत असते. (वार्ताहर)