अनवाणी भोसले लवकरच जोडे घालणार !
By Admin | Updated: October 30, 2014 01:08 IST2014-10-30T01:08:52+5:302014-10-30T01:08:52+5:30
नारायण राणो यांचा निवडणुकीत पराभव झाल्याखेरीज पायात जोडे ऊर्फ वहाणा न घालण्याची प्रतिज्ञा अरविंद ऊर्फ ‘अनवाणी’भोसले यांनी केली होती.

अनवाणी भोसले लवकरच जोडे घालणार !
मुंबई : नारायण राणो यांचा निवडणुकीत पराभव झाल्याखेरीज पायात जोडे ऊर्फ वहाणा न घालण्याची प्रतिज्ञा अरविंद ऊर्फ ‘अनवाणी’भोसले यांनी केली होती. लोकसभेत नारायण राणोंच्या मुलाचा पराभव झाल्यानंतर भोसलेंनी चपला घालाव्यात, अशी विनवणी शिवसैनिक करीत होते. पण त्यांनी जोवर नारायण राणोंचा पराभव होत नाही तोवर चपला न घालण्याचा निर्धार कायम ठेवला होता. आता विधानसभेत खुद्द नारायण राणोंचा पराभव झाल्याने एखादा चांगला दिवस पाहून आपण चपला घालणो सुरू करू, असे भोसले यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे.
कधी आपल्या विजयासाठी तर कधी विरुद्ध उमेदवाराच्या पराभवासाठी सर्वच उमेदवार प्रतिज्ञा करतात. अशीच अनवाणी राहण्याची प्रतिज्ञा शिवसेनेच्या अरविंद भोसले यांनी केली आणि ती राज्यभर गाजली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी राणोंच्या मुलाचा पराभव केला, त्या वेळी ‘मुलगा पडला म्हणजे बाप पडला, आता तरी पायात चपला घाल’, असे उद्धव ठाकरे यांनी भोसलेंना सांगितले. पण शिवसेनाप्रमुखांना दिलेल्या शब्दामुळे आजतागायत अरविंद भोसले अनवाणी आहेत. विधानसभेत कोकणातील जनतेने नारायण राणोंना भुईसपाट केल्याने आता नक्की चपला घालू, असे भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भोसलेंकडून 1,2क्क् चपला जोड वनवासींना
च्अखेर 9 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अरविंद भोसले पायात चप्पल घालणार आहेत. सुमारे 1,2क्क् चपलांचे जोड आजर्पयत शिवसैनिकांनी त्यांना पाठवले आहेत. हे सर्व चपलांचे जोड एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कसारा, इगतपुरी येथील वनवासींना देण्यात येणार आहेत.