नवरात्रोत्सवाच्या खरेदीला उधाण

By Admin | Updated: October 5, 2015 23:52 IST2015-10-05T23:52:56+5:302015-10-05T23:52:56+5:30

नवरात्रीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून उत्सवाचे रंग आतापासूनच वातावरणात भरू लागले आहेत. दांडिया आणि रास गरब्यासाठीच्या वस्तू खरेदीसाठी

Navratri festival purchase | नवरात्रोत्सवाच्या खरेदीला उधाण

नवरात्रोत्सवाच्या खरेदीला उधाण

नवी मुंबई : नवरात्रीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून उत्सवाचे रंग आतापासूनच वातावरणात भरू लागले आहेत. दांडिया आणि रास गरब्यासाठीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड उडाली आहे. सुंदर नक्षीकाम केलेले आकर्षक घागरे, चनिया चोली, साड्या आाण कवड्या मणी यांचा वापर केलेल्या दागिन्यांनी बाजार फुलला आहे.
नवी मुंबई परिसरातील बाजारपेठेतही नवरात्रोत्सवासाठी वेगवेगळ््या प्रकारचे डिझायनर कपडे, घागरा चोली खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दांडियानिमित्ताने वाशी सेक्टर ९ मधील कापड बाजार व एपीएमसीच्या आवारातील बाजार सजला आहे. नवरात्रीसाठी खास तयार केलेले बांधणीचे कपडे, राजस्थान, मेवाड, बडोदा, सुरत, मध्य प्रदेश येथील कारागीर आणि विक्र ेते नवी मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. गरबा-दांडिया खेळण्यासाठी वेशभूषेचा महत्त्वाचा भाग असलेल्या राजस्थानी घागऱ्याला विशेष मागणी असून त्यात सुंदर नक्षीकाम असलेले घागरे, साड्या, चनिया चोली, धोती कुर्त्यांकडे तरु णाईचा कल अधिक आहे. खास राजस्थानी स्टाइल कुर्त्यांनाही अधिक मागणी आहे. तसेच पारंपरिक गुजराती, मारवाडी पद्धतीचे कपडे बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या कपड्यांच्या किमती १००० रु पयांपासून सुरू होत आहेत, तसेच भाड्याने कपडे घेण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. ड्रेसनुसार दोनशे रुपयांपासून ते सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत एका रात्रीचे भाडे आकारले जाते.
रंगीबेरंगी चनिया चोली बाजारात सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गरबा, दांडियासाठी या चनिया चोली खरेदीसाठी महिलांची बाजारातील कपड्याच्या दुकानात गदी पहावयास मिळत आहे.(प्रतिनिधी)

चनिया चोलीला मागणी
रंगीबेरंगी चनिया चोली बाजारात सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून लाल, पिवळ्या, निळ्या, तसेच काळ्या, हिरव्या अशा विविध रंगांच्या चनिया चोली आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. कच्छी भरतकाम केलेल्या चनिया चोली सर्व वयोगटांतील महिला वर्गासाठी उपलब्ध असून मिरर वर्क, बॉर्डर स्टाइल, गोटा वर्कअशी विविध कारागिरी केलेल्या चनिया चोलीलासुद्धा मागणी आहे. साधारणत: अडीच हजारांपासून ते ६० हजारांपर्यंत चनिया चोली बाजारात उपलब्ध आहे.

Web Title: Navratri festival purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.