वडाळ्यात नवरात्र मंडळावर गुन्हा
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:03+5:302014-10-04T22:55:03+5:30
वडाळ्यात नवरात्र मंडळावर गुन्हा

वडाळ्यात नवरात्र मंडळावर गुन्हा
व ाळ्यात नवरात्र मंडळावर गुन्हा मुंबई: दुर्गादेवी विसर्जनादरम्यान अश्लील गाणी लावणार्या एका मंडळावर वडाळा ट्रक टर्मिंनल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या मंडळाची काल सायंकाळी संगमनगर येथून विसर्जन मिरवणूक सुरु होती. मात्र याच वेळी डीजेवर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्लील आणि देशाचा अवमान करणारी गाणी वाजवली. त्यामुळे पोलिसांनी मंडळाचे कार्यकर्ते शशिकांत जैस्वाल आणि आणि रमेश दुबेसह ६ ते ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)