नवी मुंबई बनले एकात्मतेचे प्रतीक
By Admin | Updated: October 31, 2014 00:32 IST2014-10-31T00:32:40+5:302014-10-31T00:32:40+5:30
आधुनिकतेचा वसा घेतलेल्या नवी मुंबई शहराने राष्ट्रीय एकात्मतेचा नवीन आदर्श निर्माण केला आहे.

नवी मुंबई बनले एकात्मतेचे प्रतीक
नामदेव मोरे - नवी मुंबई
आधुनिकतेचा वसा घेतलेल्या नवी मुंबई शहराने राष्ट्रीय एकात्मतेचा नवीन आदर्श निर्माण केला आहे. देशातील सर्व राज्यांची भवन व सांस्कृतिक केंद्रे येथे डौलाने उभी असून, मिनी भारत म्हणूनही शहराची ओळख निर्माण झाली आहे.
सिडकोने नवी मुंबईची निर्मिती करताना टोलेजंग इमारती व पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन होईल अशाप्रकारे शहराची रचना केली आहे. वाशीसारख्या शहराचे हृदय समजल्या जाणा:या विभागात प्रत्येक राज्याच्या सांस्कृतिक केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. बंगाली असोसिएशन, कन्नड, तमिळ संघ, मराठा भवन, साहित्य संस्कृती मंडळ व इतर सामाजिक संस्थांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सर्व राज्यांच्या भवनासाठी भूखंड दिले आहेत. या जागेवर उत्तरप्रदेश भवन, आसाम भवन, केरळ भवन, राजस्थान भवन व इतर राज्यांच्या भव्य वास्तू उभ्या राहिल्या आहेत. या भवन व सांस्कृतिक केंद्रांमधून संबंधित राज्यातील कला, संस्कृतीचे दर्शन घडवत आहेत.
नवी मुंबईमध्ये कधी भाषा, संस्कृती व प्रांतवादावरून भांडणो होत नाहीत. या शहरात गुढीपाडवा ज्या उत्साहाने साजरा होतो त्याच उत्साहाने पोंगलही साजरा केला जातो. देशाच्या कानाकोप:यातून आलेले नागरिक एकमेकांच्या उत्सवामध्ये सहभागी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत असते. या शहरात सर्वधर्मीयांच्या धार्मिक स्थळांनाही प्रत्येक विभागात पुरेशी जागा उपलब्ध करून दिली आहे. शहरात फक्त टोलेजंग इमारती उभ्या केलेल्या नाहीत. इमारतींच्या उंचीप्रमाणो येथे राहणा:या नागरिकांची मनेही विचारांनी उंच राहतील याची काळजी रचनाकारांनी घेवून ठेवली आहे. विस्तारीकरणासोबत शहराची सांस्कृतिक उंचीही वृद्धिंगत होत आहे.
च्संस्कृतीची जपणूक हा नवी मुंबईचा स्थायीभाव आहे. येथे आगरी - कोळी बांधवांनी प्राणपणाने संस्कृतीचे जतन केले आहे. कोळी बांधव नारळी पौर्णिमा पूर्वीच्याच उत्साहाने साजरी करत आहेत. घणसोली गावातील गोकूळअष्टमी महोत्सवाला 1क्क् वर्षाची परंपरा लाभली आहे.
च्दिवाळे गावात दिवाळीदिवशी देवाच्या शोधासाठी समुद्रमंथन करण्याची परंपरा अर्धशतकापासून सुरू आहे. गावच्या यात्रंपासून ते नेरूळमध्ये सिडको संचालक नामदेव भगत यांच्या आगरी - कोळी महोत्सवार्पयत सर्व कार्यक्रमांतून संस्कृती जतनासह देशभरातून आलेल्या नागरिकांनाही या उत्सवांमध्ये सहभागी करून घेतले जात आहे.
भाषांचीही देवाणघेवाण : नवी मुंबईमध्ये देशाच्या बहुतांश सर्व राज्यांमधील सांस्कृतिक केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये मराठी भाषेचे वर्ग आयोजित केले जात आहेत. देशभरातून नोकरी व व्यवसायासाठी आलेले नागरिक मराठी भाषा अवगत करून घेत आहेत. इतर भाषिकांना त्यांची भाषा शिकविण्याचीही व्यवस्था केली आहे.