आचारसंहितेचा फटका नवरात्रोत्सवाला
By Admin | Updated: September 25, 2014 23:36 IST2014-09-25T23:36:16+5:302014-09-25T23:36:16+5:30
राजकीय पक्षांना आपापल्या पक्षाचे ब्रँडिंग करण्यासाठी नवरात्रोत्सव हा चांगला आणि सोपा पर्याय होता. मात्र विधानसभेच्या निवडणुका या नवरात्रोत्सवातच आल्या आहेत

आचारसंहितेचा फटका नवरात्रोत्सवाला
आविष्कार देसाई, अलिबाग
राजकीय पक्षांना आपापल्या पक्षाचे ब्रँडिंग करण्यासाठी नवरात्रोत्सव हा चांगला आणि सोपा पर्याय होता. मात्र विधानसभेच्या निवडणुका या नवरात्रोत्सवातच आल्या आहेत. या कालावधीत आचारसंहिता सुरु असल्याने त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोचण्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यातील राजकीय पक्ष आपापले पक्षीय संघटन वाढावे यासाठी विविध गणेश मंडळे, गोविंदा पथके तसेच नवरात्रोत्सव मंडळांना स्पॉन्सरशिप देऊ करतात, तर काही मंडळे ही राजकीय पक्षांच्या अमलाखालीच असल्याचे दिसून येते. या मंडळांमध्ये तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात असतो. अशा मंडळांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन ते जनतेपर्यंत पोचण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पक्षाची जाहिरात, चिन्हाचा वापर करुन जनतेच्या नजरेत राहण्याचाही प्रयत्न करीत असतात.
मोठ्या संख्येने उभारलेल्या अशा पक्षीय संघटनेचा वापर निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष चांगले नेटवर्क म्हणून करताना दिसून येतात. जनतेपर्यंत पोचणे आणि संघटनेचा नेटवर्क म्हणून वापर करणे अशी दोन्ही कामे त्यांच्याकडून केली जातात.
१३ आॅक्टोबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने सर्वच उमेदवारांकडे प्रचारासाठी फारच कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे.