दुसऱ्या खेपेतील ऑक्सिजनसह नौदलाचे जहाज मुंबईत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:07 IST2021-05-13T04:07:40+5:302021-05-13T04:07:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाविरोधातील राष्ट्रव्यापी लढ्यात वैद्यकीय साधनसामग्री पोहोचविण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन समुद्रसेतू-२ हाती घेतले आहे. त्या ...

दुसऱ्या खेपेतील ऑक्सिजनसह नौदलाचे जहाज मुंबईत दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाविरोधातील राष्ट्रव्यापी लढ्यात वैद्यकीय साधनसामग्री पोहोचविण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन समुद्रसेतू-२ हाती घेतले आहे. त्या अंतर्गत दुसऱ्या खेपेतील ४० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन टँकर आणि सिलिंडरसह नौदलाची तरकश ही युद्धनौका बुधवारी मुंबईत दाखल झाली.
कोरोनाच्या लढतीत फ्रान्सने भारतासाठी सहकार्याचा हात पुढे केला असून, ‘ऑक्सिजन साॅलिडॅरेटी ब्रिज’ या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. या अंतर्गत दोन महिन्यांत ६०० मे. टन द्रवरूप ऑक्सिजन भारतात आणला जाणार आहे. त्यानुसार १० मे, सोमवारी पहिल्या खेपेत ‘आय.एन.एस. त्रिकंद’मधून ४० मे.टन ऑक्सिजन आणण्यात आले होते, तर बुधवारी ‘आय.एन.एस. तरकश’मधून दुसऱ्या खेपेतील साहित्य मुंबईतील नौदलाच्या गोदीत उतरविण्यात आले. प्रत्येकी २० टन द्रवरूप ऑक्सिजनसह दोन क्रायोजेनिक टँकर, तसेच २३० ऑक्सिजन सिलिंडर बुधवारी नौदलाकडून स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.