नवल बजाज नवे एटीएस प्रमुख
By मनोज गडनीस | Updated: June 19, 2024 22:18 IST2024-06-19T22:18:24+5:302024-06-19T22:18:38+5:30
नवल बजाज सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये सह-संचालकपदावर कार्यरत होते.

नवल बजाज नवे एटीएस प्रमुख
मुंबई - ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची बुधवारी नेमणूक करण्यात आली आहे.
१९९५ च्या भारतीय पोलिस सेवेच्या तुकडीचे अधिकारी असलेले नवल बजाज सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये सह-संचालकपदावर कार्यरत होते. सीबीआयमध्ये असताना त्यांनी अनेक महत्वांच्या प्रकरणांचा उलगडा केला आहे. महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेल्या नवल बजाज यांनी यापूर्वी मुंबई पोलिसांच्या प्रशासन शाखेचे सह-आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. तसेच, मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभारही सांभाळला आहे.