Join us  

मराठा आंदोलनाचे स्वरूप बदलावे लागेल - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 3:42 AM

नारायण राणे; आझाद मैदानातील नियुक्तीच्या प्रतीक्षेतील आंदोलकांची घेतली भेट

मुंबई : मराठा उमेदवारांचे आझाद मैदानात नियुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे, परंतु त्याची सरकार दखल घेत नाही. त्यामुळे केवळ आंदोलनाला बसून फायदा नाही, तर आंदोलनाचे स्वरूप बदलायला हवे, असे मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले. राणे यांनी शुक्रवारी आंदोलकांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मराठा समाजाला महाराष्ट्र अधिनियम क्र. ६२ मधील कलम १८ अन्वये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून २०१४ सालच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना तत्काळ नियुक्तीसाठी मराठा उमेदवारांचे २८ जानेवारीपासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. राणे म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात उमेदवारांनी भेट घेत, त्यांच्यासमोर प्रश्न मांडला असता, तर त्याच वेळी प्रश्न सुटला असता. मराठा आरक्षण लागू झाले असताना, आता मराठा समाजातील उमेदवारांना डावलले योग्य नाही. सोमवारी संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना याचा जाब विचारला जाईल. मराठा आरक्षणाप्रमाणे नियुक्त्याही झाल्याच पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करेन, असा विश्वास नारायण राणे यांनी आंदोलनकर्त्यांना दिला.

टॅग्स :नारायण राणे मराठा आरक्षण