शहरात राष्ट्रवादीच किंगमेकर!

By Admin | Updated: May 10, 2015 04:40 IST2015-05-10T04:40:31+5:302015-05-10T04:40:31+5:30

शिवसेना नेत्यांनी चमत्कार घडविण्याच्या वल्गना केल्यामुळे महापौर निवडणुकीविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु कोणत्याही चमत्काराशिवाय निवडणुका

Nationalist Kingmaker in city! | शहरात राष्ट्रवादीच किंगमेकर!

शहरात राष्ट्रवादीच किंगमेकर!

नवी मुंबई : शिवसेना नेत्यांनी चमत्कार घडविण्याच्या वल्गना केल्यामुळे महापौर निवडणुकीविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु कोणत्याही चमत्काराशिवाय निवडणुका पार पडल्या व नवी मुंबईत राष्ट्रवादीच किंगमेकर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. महापौरपदी अपक्ष सुधाकर संभाजी सोनावणे यांची तर उपमहापौरपदी काँगे्रसचे अविनाश शांताराम लाड यांची निवड झाली आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर करून आनंद साजरा केला.
कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे महापौर कोणाचा होणार याविषयी शहरवासीयांना उत्सुकता होती. राष्ट्रवादीने पाच अपक्ष व काँगे्रसशी आघाडी केल्यामुळे त्यांचे संख्याबळ ६७ झाले होते. विरोधकांकडे फक्त ४४ एवढेच संख्याबळ होते. परंतु ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार चमत्कार घडविण्याच्या वल्गना केल्या. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचे सूतोवाच केल्यामुळे निवडणुकीमधील रंगत वाढली होती. निवडणुकीमध्ये सदस्य पळविण्याच्या घटना होऊ नये यासाठी सर्वच पक्षांनी आवश्यक ती खबरदारी घेतली होती. पोलिसांनी महापालिका मुख्यालयाभोवती कडक बंदोबस्त ठेवला होता. ओळखपत्राशिवाय आतमध्ये सोडण्यात येत नव्हते. माजी नगरसेवकांनाही बाहेरच थांबविले होते. कसून झडती घेतली जात होती.
पिठासीन अधिकारी म्हणून रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी काम पाहिले. राष्ट्रवादीचे महापौरपदाचे उमेदवार आरक्षित प्रभागातून निवडणूक लढले नसल्याचा आक्षेप शिवसेना उमेदवारांनी घेतला. परंतु भांगे यांनी तो फेटाळला. हा प्रसंग वगळता सर्व निवडणूक शांततेत पार पडली. महापौरपदावर राष्ट्रवादी समर्थक सुधाकर सोनावणे यांची व उपमहापौरपदावर काँगे्रसच्या अविनाश लाड यांची निवड होताच आघाडीच्या सदस्यांनी घोषणा देऊन त्यांचे अभिनंदन केले.
उपस्थितांना मिठाई देऊन आनंद साजरा करण्यात आला. महापौर निवडणुकीचे साक्षीदार होण्यासाठी मावळते महापौर सागर नाईक, राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, काँगे्रस नेते रमेश बागवे, मुश्ताक अंतुले, माजी खासदार संजीव नाईक अभ्यागत कक्षात उपस्थित होते. शिवसेना - भाजपाकडून मात्र एकही वरिष्ठ नेता उपस्थित नव्हता.

Web Title: Nationalist Kingmaker in city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.